IMPIMP

Pune PMC Water Supply | पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी

by nagesh
Pune PMC Water Supply News | Pune Water cut for one day a week from May 18, city water supply will be closed on this day IAS Vikram Kumar Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपावसाने ओढ दिल्याने मुंबई पाठोपाठ आता पुणेकरांवर ही पाणी कपातीचं (Water Cut) संकट आलं आहे. याचे मुख्य कारण पुणे शहराला (Pune City) पाणी पुरवठा (Pune PMC Water Supply) करणाऱ्या खडकवासला (Khadakwasla Dam) साखळी धरणातील जलसाठा कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) प्रशासनाने पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (दि.4) शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यापूर्वी प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे (Pune PMC Water Supply) वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे पत्र जलसंपदा विभागाने (Water Resources Department) महापालिकेला पाठवले होते. पुण्याकडे व धरण क्षेत्रात अद्याप पावसाला (Pune Rain) सुरुवात झाली नाही. चार धरणात मिळून केवळ अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडला तर स्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याची (Pune PMC Water Supply) तीन दिवसांपूर्वी बैठक होणार होती, पण ही बैठक रद्द झाल्याने निर्णय लांबणीवर पडला होता.

पुण्यात अगोदरच असमान पाणी पुरवठा होत असून काही भागात दिवसभर पाणी असते तर काही भागात दिवसातून एक वेळच पाणी मिळत आहे. त्यामुळे पाणी कपात झाली तर कमी दाबाने पाणीपुरवठा होऊन पुणेकरांना पाणीच मिळणार नाही अशी स्थिती उद्भवत असल्याचे यापूर्वीच्या पाणी कपातीमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाणी कपातीनंतरही पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी एक दिवसाआड पाणी केली जाते. यंदाही पाणी कपात करण्याच निर्णय झाल्यावर त्याची अंमलबजावणी कशी करायची याची तयारी प्रशासन नियोजन करत आहे.

याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी गुरुवारी (दि.30) पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कशा पद्धतीने नियोजन केले आहे याचा आढावा घेतला. पुण्यातील पाणी पुरवठ्याची यंत्रणा पाहता पाणी कपात करताना एक दिवसाआड पाणी देणेच शक्य आहे. त्यामुळे त्याचे वेळापत्रक जाहीर करुन सोमवारपासून अंमलबजावणी करावी अशी चर्चा बैठकीत झाली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की, धरणातील पाणी साठा कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे. सोमवार पासून पुण्यामध्ये पाणी कपात लागू होईल. त्याचे वेळापत्रक व इतर निर्णय शुक्रवारी (दि.1) अंतिम केला जाईल. पाऊस लांबणीवर पडल्याने महापालिकेला हा निर्णय घ्यावा लगत असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

पुण्यात 30 टक्के पाणी कपात
पुणे शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असला
तरी एकूण पाणी वापरता साधारणपणे 25 ते 30 टक्क्यांपर्यंत पाणी कपात केली जाईल.
सध्या रोजचा पाण्याचा वापर 1650 एमएलडी एवढा आहे.
त्यात 30 टक्क्यांपर्यंत कपात केली तर रोज 1200 एमएलडी पाणी वापर करावा लागणार आहे.
रोजचा 450 एमएलडी वापर कमी होणार असल्याने काही भागात पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title :- Pune PMC Water Supply | Pune pmc water supply issue pune rain monday khadakwasala dam area

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन; म्हणाले – ‘माझ्या पाठीत वार करा, पण…’

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं, राज्यपाल घटनाबाह्य वागतात; शिवसेनेचा आरोप

Chief Minister of Maharashtra | साताऱ्याने महाराष्ट्राला दिले चार मुख्यमंत्री

Related Posts