IMPIMP

Pune PMC Water Supply | पावसाने पाठ फिरवली ! पुणे शहरात लवकरच पाणी कपात

by nagesh
Pune PMC Water Supply Dept News | Pune Municipal Corporation: One day of water reduction in the city soon! In the background of El Nino, preparations for the municipal government are underway

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune PMC Water Supply | पावसाने ओढ दिल्याने पाण्याचे संकट आणखीनच गडद झाले आहे. यापार्श्वभूमीवर पुणे महापालिका सतर्क झाली असून आज महापालिका अधिकारी वेधशाळेत जाऊन आगामी काळातील पावसाचा अंदाज जाणून घेणार आहेत. त्याचवेळी उद्या पाणी पुरवठ्याबाबत बैठक घेऊन ‘ पाणी कपात’ करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी (PMC Officers) दिली. (Pune PMC Water Supply)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहील असा अंदाज वेधशाळेने तसेच स्कायमेट ने दिला असला तरी जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवली आहे . शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी मध्ये जेमतेम 2. 76 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाअभावी शेतकरी देखील चिंतेत आहे. (Pune PMC Water Supply)

मागील काही वर्षांचा अनुभव पाहता पाटबंधारे विभाग 15 जुलैपर्यंत पुणे शहराच्या पाण्याचे नियोजन केले जाते. गेली पाच वर्षे जून महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाणी कपातीचे संकट दूर राहिले. यंदा मात्र परिस्थिती अधिकच बिघडली आहे. जून महिन्यात 23 तारखेपासून चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने (IMD) व्यक्त केला होता. परंतु चार दिवस होत आले तरी पावसाचा पत्ता नसल्याने पालिका अधिकाऱ्यांचा संयम संपत चालला आहे.

या पार्श्वभूमीवर आज महापालिका अधिकाऱ्यांनी स्वतः वेधशाळेत जाऊन माहिती घेतली.
तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उद्या आयुक्तांच्या उपस्थितीत पाणी पुरवठा विभागाची बैठक होणार आहे.
या बैठकीत आढावा घेऊन ‘ पाणी कपातीचा’ निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Pune PMC Water Supply | The rain turned its back! Water cut soon in Pune city

हे देखील वाचा :

Eknath Shinde | सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले..- ‘हा विजय…’

Bank Holidays | जुलैमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, तपासून घ्या बँकेच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी

Shrikant Shinde On Sanjay Raut | ईडीच्या नोटीसनंतर खा. श्रीकांत शिंदेंचा टोला; म्हणाले – ‘संजय राऊतांना ED समन्स बद्दल हार्दिक शुभेच्छा’

Related Posts