IMPIMP

Pune Police | पुणे पोलिसांकडून नीलम राणे, नितेश राणे यांच्यावरील ‘लूकआऊट नोटीस’ रद्द

by nagesh
Pune Police | Pune police cancels ‘lookout notice’ on Neelam Rane and Nitesh Rane

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी (DHFL loan case) केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane) आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून (Pune Police) लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दरम्यान, राणे कुटुंबीयांनी थकवलेले पैसे भरल्याची माहिती बँकेने पुणे पोलिसांना (Pune Police) दिली. त्यामुळे पुणे पोलिसांनी राणे कुटुंबीयांला बजावलेली लुकाआऊट नोटीस (Lookout notice)  रद्द केली आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  (CP Amitabh Gupta) यांनी दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

डीएचएफएल बँकेकडून घेतलेले 65 कोटी रुपयांपैकी 61 कोटी 22 लाख रुपयांचे कर्ज थकवल्या प्रकरणी निलम राणे आणि नितेश राणे यांना पुणे
पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती. ही नोटीस मागील महिन्यात जारी करण्यात आली होती. यामध्ये राणे कुटुंबासह 30 जणांचा समावेश
होता. दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (Diwan Housing Finance Ltd.) या कंपनीने यासंदर्भात केंद्र सरकारकडे (Central Government) तक्रार केली होती.

पुणे गुन्हे शाखेचे (Pune Police Crime Branch) पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांनी 3 सप्टेबर रोजी लुकआऊट नोटीस बजावली होती. डीएचएफएलकडून पुणे पोलिसांना नुकतेच एक पत्र प्राप्त झाले. त्यात संबंधितांनी सर्व पैसे भरल्याचे कळविले. त्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) जारी केलेली लुकआऊट नोटीस मागे घेण्यात आली आहे.

Web Title: Pune Police | Pune police cancels ‘lookout notice’ on Neelam Rane and Nitesh Rane

हे देखील वाचा :

SBI WECARE | खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80 टक्के जास्त व्याज, मार्च 2022 पर्यंत आहे गुंतवणुकीची संधी

MSEDCL | पश्चिम महाराष्ट्रात 5.64 कोटींच्या वीजचोरीचा पर्दाफाश, पुणे जिल्ह्यात 889 ठिकाणी 81 लाखांची विजचोरी उघड

Pune News | पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये ऑटोरिक्षाच्या भाडेदरात 8 नोव्हेंबरपासून वाढ; जाणून घ्या दर

Deepak Ramchandra Mankar | राष्ट्रवादीचे निष्ठावान आणि पवार कुटुंबाचे निकटवर्ती दीपक मानकर यांचे निधन

Related Posts