IMPIMP

Pune police | पोलिसांच्या स्पर्धेला रिक्षावाल्यांचे प्रत्युत्तर, पोलिसांसाठी आयोजित केली 1 कोटी बक्षिसांची स्पर्धा

by nagesh
Pune police | Rickshaw pullers' response to police competition, 1 crore prize competition organized for police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे पोलिसांनी (Pune police) शहरातील रिक्षाचालकांसाठी ‘माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा 2021’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या (lashkar police station) वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांत रिक्षाचालकांवर (Rickshaw) गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा या हेतूने पुणे पोलिसांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. मात्र, आता पुणे पोलिसांच्या या स्पर्धेला रिक्षावाला संघटनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संघटनेकडून पोलिसांसाठीच तब्बल एक कोटी रुपये बक्षिस असणारी अनोखी स्पर्धा आयोजित (1 crore prize competition for pune police) केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लष्कर पोलिसांनी (lashkar police) आयोजित केलेल्या स्पर्धेचा निषेध म्हणून ‘पोलीस ठाणे, प्रामाणिक पोलीस ठाणे’ (Pune Police) अशी विडंबनात्मक स्पर्धा ‘बघतोय रिक्षावाला फोरम’ राबवत आहे. शहरातील ज्या पोलीस ठाण्यात फायनान्स कंपन्यांच्या (finance companies) गुंडागर्दी विरोधात तक्रारी झाल्या असतील अशा पोलीस ठाण्यांचा गौरव आम्ही करणार आहोत.
असे संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर (Dr. Keshav Kshirsagar) यांनी सांगितले.
पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत पोलिसांनी पोलिसांचं काम करावं व रिक्षावाल्यांची प्रतिमा स्पर्धा घेऊन खराब करु नये, असेही क्षिरसागर यांनी म्हटले.

डॉ. क्षीरसागर म्हणाले, पुणे पोलिसांनी शहरातील रिक्षाचालकांसाठी स्पर्धा घेऊन त्यांची प्रतिमा मलीन करत असल्याचे दिसत आहे.
पुणे पोलिसांनी फायनान्स कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे.
माहितीच्या अधिकारात पुणे पोलीस आयुक्त (Pune CP) आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त (Pimpri Chinchwad CP) कार्यालयाने माहिती दिली आहे.
फायनान्स कंपनीविरुद्ध पोलीस गुन्हे का दाखल करत नाहीत, म्हणून ही स्पर्धा आम्हाला घ्यावी लागत असल्याचे त्यांनी म्हटले.

Web Title : Pune police | Rickshaw pullers’ response to police competition, 1 crore prize competition organized for police

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; दिलं ‘या’ दिग्गजांना आव्हान

Pune Corporation | नगरसेवकांच्या आवडत्या निधीला आयुक्तांची ‘कात्री’, सह यादीतील कामे न करण्याचे आदेश

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 109 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts