IMPIMP

Pune Political News | ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर काँग्रेसला मोठा झटका, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदेंचे पुतणे प्रणय शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश

by nagesh
Pune Political News | Big blow to Pune city Congress on the eve of PMC elections PMC Congress group leader Arvind Shinde s nephew Pranay Shinde joins BJP

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Political News | आगामी काळात पुणे महापालिका (Pune Corporation) निवडणूक (PMC Elections) होत असून सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान पुणे शहर काँग्रेसला (Pune Congress) ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका बसला आहे. पुणे मनपा गटनेते अरविंद शिंदे (Corporator Arvind Shinde) यांचे पुतणे (Nephew) आणि समाजसेवक तुकाराम शिंदे (Social worker Tukaram Shinde) यांचे नातू प्रणय शिंदे (Pranay Shinde) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये (Pune BJP) प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी प्रणय शिंदे यांचे पक्षामध्ये स्वागत केले आहे. (Pune Political News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP Pune City President Jagdish Mulik), पुणे मनपा गटनेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar), संघटन सरचिटणीस राजेश पांडे (General Secretary Rajesh Pandey), युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर (Raghavendra (Bapu) Mankar), भाजपा पुणे शहर सरचिटणीस दीपक पोटे (Corporator Deepak Pote), पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर (Spokesperson Sandeep Khardekar), युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत (Abhijeet Raut) आदी उपस्थित होते. (Pune Political News)

पक्ष प्रवेशानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींजीच्या (PM Narendra Modi) कामामुळे आज प्रत्येकजण भारतीय जनता पक्षाशी जोडला जात आहे.
त्यामुळेच भाजपा (BJP) आज जगातील क्रमांक एकचा पक्ष झाला आहे.
प्रणय शिंदे यांनी संघटन वाढीसह मोदीजींची कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे. (Pune Politics)

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, एखाद दुसऱ्या पक्षांतरामुळे भाजपाचे काहीही नुकसान होत नाही.
उलट आगामी काळात शहरातील अनेक दिग्गज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.
त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत होण्यास अजून मदतच होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रणय शिंदे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कामामुळे प्रभावित होऊन आज पक्षात प्रवेश करत आहे.
भविष्यात पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, प्रणय शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना भाजपा युवा मोर्चा पुणे शहरच्या उपाध्यक्ष पदी नियुक्तीची घोषणा युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर यांनी केली.

Web Title :- Pune Political News | Big blow to Pune city Congress on the eve of PMC elections PMC Congress group leader Arvind Shinde s nephew Pranay Shinde joins BJP

हे देखील वाचा :

High BP Symptoms | हाय ब्लड प्रेशरच्या ‘या’ 8 वॉर्निंग साईनकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Post Office Schemes | किसान विकास पत्रमध्ये 10 वर्षात पैसे होतात दुप्पट; जाणून घ्या कशी करावी गुंतवणूक

Nitesh Rane | …म्हणून नितेश राणे यांच्या कोठडीतील मुक्काम वाढणार

Yellow Teeth Home Remedies | दातांचा पिवळेपणा तुमच्यासाठी सुद्धा समस्या बनला आहे का? ‘या’ 6 घरगुती उपायांनी होतील चमकदार

Related Posts