IMPIMP

Pune Ring Road – Land Acquisition | रिंगरोडच्या भूसंपादनाला सुरूवात

by nagesh
Pune Ring Road - Land Acquisition | Land Acquisition Starts For Pune Ring Road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Ring Road – Land Acquisition | महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) करण्यात येणार असलेल्या रिंगरोडसाठी भूसंपादनाला सुरूवात करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील उर्से गावातील अडीच एकर क्षेत्र असलेल्या जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यात आला असून संबंधित बाधित शेतकऱ्याची मोबदल्याची रक्कम थेट बँक खात्यावर धनादेशाद्वारे वर्ग करण्यात आली आहे. (Pune Ring Road – Land Acquisition)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एमएसआरडीसीच्या रिंगरोडचे पुर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व भागात मावळातील ११ गावे, खेडमधील १२ गावे, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांचा समावेश आहे. यातील ३६ गावांतील जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार निधी उपलब्ध झाल्याने वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. या प्रकल्पासाठी स्वखुशीने जागा देणाऱ्यांना पाचपट मोबदला देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.त्यानुसार उर्से येथील शेतकऱ्याने स्वखुशीने जागा दिल्यामुळे मावळ तालुक्यातील उर्से गावची निवाडा प्रक्रिया पार पडल्यानंतर अडीच एकर क्षेत्र असणाऱ्या संबंधित शेतकऱ्याला पाच कोटी ६५ लाख ९२ हजार ८०२ रुपयांना मोबदला थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. (Pune Ring Road – Land Acquisition)

दरम्यान, राज्य सरकारकडून प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी २५० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार मावळ तालुक्यातील उर्से गावीच निवाडा प्रक्रिया पार पडली असून कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया देखील पार पडली आहे. त्यानुसार या गावातील बाधिताला मोबदल्याच्या रकमेचा धनादेश देण्यात आला असून प्रत्यक्षात भूसंपादनाला सुरुवात झाली आहे. पुढील भूसंपादन प्रक्रियेला वेग येणार असल्याने निधीबाबत कमतरता पडू नये म्हणून लवकरच राज्य सरकारकडे निधीबाबत प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तपासणीअंतीच निधी वर्ग

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी
अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकल्पासाठी दीड हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा केली.
त्यानुसार नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात २५० कोटी
रुपये वर्ग केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात दिली.
त्यानुसार हा निधी रस्ते महामंडळाकडे प्राप्त झाला आहे. निवाडा प्रक्रिया झाल्यानंतर रस्ते महामंडळ आणि
जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादनासाठी नेमण्यात आलेले गावनिहाय भूसंपादन अधिकारी यांचे बँकेत संयुक्त
खाते उघडण्यात आले आहे. बाधितांची गावातील शेतकऱ्यांचा अहवाल क्षेत्रानुसार माहिती आणि इतर कागदपत्रांची
रस्ते महामंडळाच्या लेखा कोषागार विभागाकडून तपासणी केल्यानंतर निधी वर्ग करण्यात येणार आहे.
तसेच या प्रकल्पासाठी राज्य शासनाने भरगोस निधी दिल्याने भूसंपादनाला वेग देण्याचे रस्ते महामंडळाकडून सांगण्यात आले.

Web Title :- Pune Ring Road – Land Acquisition | Land Acquisition Starts For Pune Ring Road

हे देखील वाचा :

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्यासाठी ड्रिलिंगचे काम सुरू

Pune Minor Girl Rape Case | जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चाकण परिसरातील घटना

Sachin Sawant | ‘सर आली धावून, भाजप ऑफिस गेले वाहून!’, पुण्यातील रस्त्यावर साचलेल्या पाण्यावरुन सचिन सावंतांचा भाजपला खोचक टोला

Related Posts