IMPIMP

Pune RTO Office | पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 57 वाहनांचा जाहीर ई-लिलाव

by nagesh
Pune RTO Office | Public e-auction of 57 vehicles through Pune Regional Transport Office

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन Pune RTO Office | मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या ५७ वाहनांचा जाहीर ई-लिलाव (Public e-Auction) प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. (Pune RTO Office)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे, आळंदी रोड कार्यालय व वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये टुरिस्ट टॅक्सी, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे. (Pune RTO Office)

ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचनाफलकांवर व तसेच https://eauction.gov.in/eauction या संकेतस्थळावर माहितीसाठी लावण्यात आली आहे. तसेच लिलावाचे अटी व नियम ६ फेब्रुवारीपासून या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध असतील.

जाहीर ई-लिलावात ७ ते ९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत https://eauction.gov.in/eauction या संकेतस्थळावर सहभागी होता येणार आहे.
जीसटी धारकांनाच ई-लिलावात सहभागी होता येणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रादेशिक परिवहन कार्यालयात हलके वाहनास २५ हजार रुपये व
अवजड वाहनास ५० हजार रुपये रकमेचा धनाकर्ष ‘आरटीओ पुणे’ या नावे सादर करावा.
ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील.

कोणतेही कारण न देता ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी तथा कराधान प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

Web Title :- Pune RTO Office | Public e-auction of 57 vehicles through Pune Regional Transport Office

हे देखील वाचा :

MLA Siddharth Shirole | विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल जानेवारी 2024 पर्यंत व्हावा; आमदार शिरोळे यांची मागणी

NCP MLA Rohit Pawar | ‘बागेश्वर बाबाला उपरती झाली, पण मुंबईत बसलेल्या बाबाला…’ रोहित पवारांचा राज्यपालांना टोला

BJP MLA Nitesh Rane | उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले-‘उद्धव ठाकरे हे नाXX…’

Related Posts