IMPIMP

Pune ST Workers Strike | सरकारने एसटी स्थानकात ‘सवत’ आणल्यानं ST कामगारांचा ‘जागरण गोंधळ

by nagesh
Pune ST Workers Strike | pune st bus strike dissatisfied with the government bringing private vehicles to the swargat st station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune ST Workers Strike | मागील दोन ते तीन दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचा-यांचा राज्यव्यापी संप सुरू (Pune ST Workers Strike) आहे. या संपामुळे येणा-या जाणा-या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. या पार्श्वभुमीवर खासगी गाड्यांना सरकारकडून परवानगी देण्यात आलीय. खासगी ट्रॅव्हल्स (Private Travels) चालकांना सीएसटी स्थानकातून गाड्या सोडण्यात परवानगी देऊन शासनाने आज एसटी स्थानकात सवत आणलीय. असं सांगत एसटी कर्मचाऱ्यांनी आज (बुधवारी) पुण्यात जागरण गोंधळ घातला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राज्यव्यापी एसटी कामगारांच्या (ST Workers) संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
मात्र, आपल्या प्रलंबित मागण्यासाठी एसटी कामगार ठाम आहेत.
त्यांनी आंदोलने  सुरूच केली आहेत. दरम्यान, सरकारने स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड,
पुणे स्टेशन या स्थानकामधून खासगी ट्रॅव्हल्सला प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.
या पार्श्वभुमीवर एसटी कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
त्यामुळे एसटी कामगारांनी आज (बुधवारी) सकाळी साडे अकराच्या सुमारास हा जागरण गोंधळ घातला असल्याचे एसटी चालकांनी सांगितले आहे.

दरम्यान, प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेत राज्य सरकारने मंगळवारी (9 ऑक्टोबर) रोजी रात्री एसटीच्या स्थानकांमधून खासगी गाड्या सोडण्यास परवानगी दिली.
त्यानुसार आजपासून (बुधवारी) स्वारगेट स्थानकातून सकाळी 8 वाजल्यापासून खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या सोडण्यास सुरुवात झाली.
त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे  वातावरण निर्माण झाले.

Web Title : Pune ST Workers Strike | pune st bus strike dissatisfied with the government bringing private vehicles to the swargat st station

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या हडपसरमधील धक्कादायक घटना ! प्रेमसंबंधाबाबत पतीला सांगून बदनामी करण्याची धमकी; 30 वर्षीय विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी

Pune Crime | पुण्यात चोरट्यांनी मारला लेफ्टनंट कर्नलच्या घरातील दारुच्या बाटल्यांवर डल्ला

ST Workers Strike | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

Related Posts