IMPIMP

Pune Traffic Police | पुण्यात CCTV च्या माध्यमातून ‘विनाहेल्मेट’ चालकांवर कारवाई, 2021 मध्ये पुणेकरांनी भरला तब्बल 11 कोटींचा दंड

by nagesh
Pimpri Traffic News | traffic changes on the occasion of kartiki yatra motorists please use an alternate route

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे शहरामध्ये (Pune News) विनाहेल्मेट (Withour Helmet) गाडी चालवणाऱ्यांवर पुणे वाहतूक विभागाकडून
(Pune Traffic Police) दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पुण्यात CCTV च्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडून (Pune Traffic Police) मोठ्या
प्रमाणात ही कारवाई सुरु आहे. मागील वर्षी 18 लाख 195 विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई (Preventive action) करण्यात आली आहे. त्यांना 89 कोटी 96 लाख 5 हजार 500 रुपयांचा दंड ठोठवला आहे. त्यापैकी 2 लाख 24 हजार 392 जणांनी 11 कोटी 21 लाख 96 हजार रुपयांचा दंड भरला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हजार ते दिड हजार रुपयांत मिळणारे हेल्मेट अनेकांनी खरेदी केले आहे. परंतु त्याचा वापर न केल्याने एवढा मोठा दंड पुणेकरांना भरावा लागला आहे. अद्यापही 15 लाख 74 हजार 675 जणांनी दंड भरलेला नाही. त्यांच्याकडे 78 कोटी 73 लाख 37 हजार 500 रुपयांचा दंड थकीत आहे. (Pune Traffic Police)

पुण्यात हेल्मेटसक्तीविरोधात अनेक आंदोलने झाली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) यासंदर्भात आदेश दिल्याने त्यावर राज्य सरकारही (State Government) काही करु शकत नाही. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या अनेकांना काही हजारांचा दंड झाला आहे. तरीही ते हेल्मेट वापरताना दिसत नाहीत, अशांवरही वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात आहे.

19 कोटींची तडजोड शुल्क
वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 5 लाख 93 हजार 870 केसेसमध्ये पुणेकरांनी तडजोड शुल्क म्हणून आतापर्यंत 19 कोटी 45 लाख 92 हजार 200 रुपयांचा दंड भरला आहे.
तर 17 लाख 86 हजार 161 केसेस मध्ये तब्बल 84 कोटी 48 लाख 32 हजार 700 रुपयांचा दंड थकीत आहे.

Web Title :-  Pune Traffic Police | Traffic Police helmet action pune residents have paid fine rs 11 crore in 2021

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Ratnagiri | 14 हजाराची लाच घेताना खेड महसूल विभागातील मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार

Ayurvedic Treatment For PCOD Problems | ‘या’ आयुर्वेदीक उपायाने होईल PCOD च्या समस्येवर मात; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Related Posts