IMPIMP

Pune Water Supply | ‘निवडणुकीच्या ‘प्रेशर’ने भाजपची नौटंकी तर राष्ट्रवादीला ‘प्रेशर रिलीफ’ची गरज’ – आम आदम पार्टी

by nagesh
Pune Water Supply | 'Election pressure' makes BJP's gimmick, NCP needs 'pressure relief' - Aam Aadmi Party

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Water Supply | पाणी प्रश्नावरुन सध्या पुण्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) हे कालवा समितीच्या बैठकीतून तावातावात बाहेर पडले होते. यानंतर त्यांनी थेट आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्या घरावर धडक देत त्यांच्या घरातील पाण्याचे प्रेशर (Water Pressure) तपासले. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पुण्यातील पाणी (Pune Water Supply) प्रश्नावर भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आले असताना पुणे आम आदम पार्टीने (Pune Aam Adam Party) भाजप (BJP)-राष्ट्रवादीवर (NCP) टीका केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे शहरासाठी 24 तास पाणी योजनेचे (24 Hours Water Scheme) काम सुरु झाले. मात्र, अपुरा आणि असमान पाणी वाटप, गळती यामुळे अपयश आले. यासाठी सत्ताधारी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अपयश कारणीभूत होते. या योजनेपोटी सामान्य पुणेकर पाण्यासाठी 2016-17 पासून दरवर्षी वाढीव कर (Tax) भरत आहे. या योजनेत महानगरपालिका Pune Municipal Corporation (PMC) व केंद्र सरकार (Central Government) यांचे पैसे गुंतले आहेत. असे असताना गेल्या पाच वर्षात भाजपच्या सत्ताकाळातही फारशी प्रगती झाली नसल्याचा आरोप आपने केला आहे. (Pune Water Supply)

आता मनपा मध्ये राष्ट्रवादीच्या इच्छेने नवीन गावे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे या अपयशाचे खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचे हा या भाजप,
महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) समोरचा प्रश्न आहे.
महानगरपालिका निवडणुकीचे (Municipal Elections) ‘प्रेशर’ आल्याने हे भाजप नेते आयुक्तंच्या घरी जाऊन नौटंकी करत आहेत
तर राष्ट्रवादीलाही ‘प्रेशर रिलीफ’ची गरज असल्याने रंजक प्रतिवाद करीत तोंडसुख घेत
असल्याची टीका आपचे पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत (Mukund Kirdat) यांनी केली आहे.

Web Title :- Pune Water Supply | ‘Election pressure’ makes BJP’s gimmick, NCP needs ‘pressure relief’ – Aam Aadmi Party

हे देखील वाचा :

Sharad Pawar Reaction About MLAs Houses | ‘आमदारांना मोफत घरे द्यावीत की नाहीत’?; शरद पवार म्हणाले…

Crisis Of Load Shedding in Maharashtra | …म्हणून महाराष्ट्रात 48 तासांनंतर लोडशेडिंगचे मोठे संकट ?

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दरवाढीविरोधात प्रतिकात्मक अंतयात्रा तर कार्यकर्त्यांनी मुंडन करत नोंदवला निषेध

Related Posts