IMPIMP

Pune Water Supply | पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

by nagesh
Pune Water Supply | Water supply to half of Pune city will be shut down on Thursday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Water Supply | महावितरणच्या (Mahavitaran) वतीने येत्या गुरुवारी (6 ऑक्टोबर) वारजे जलकेंद्रातील (Warje Water Centre) पंपिंग यंत्रणा (Pumping System) बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे वारजे जलकेंद्र आणि त्यावर अवलंबून असलेल्या चांदणी चौक, गांधीभवन, पाषाण, बाणेर, बावधन, बालेवाडी आणि वारजे परिसरातील पाणीपुरवठा (Pune Water Supply) बंद ठेवला जाणार आहे. शुक्रवारी (दि.7) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) कळवले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महापालिकेच्या मार्फत वारजे GSR टाकी परिसर, S.N.D.T. H.L.R व L.L.R. टाकी परिसर, स्वारगेट पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत पर्वती H.L.R. टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकर जलकेंद्र, चतुश्रृंगी टाकी परिसरातील विद्युत/पंपिंग विषयक आणि स्थापत्यविषयक तातडीच्या देखलभाल दुरुस्ती कामांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उपरोक्त ठिकाणी पंपिंग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) गुरुवारी बंद राहणार आहे.

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर

पाषाण साठवण टाकी, भूगाव रस्ता परिसर, कोकाटे वस्ती, सेंटिन हिल सोसायटी, मधुबन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी, डावी भुसारी कॉलनी आणि चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेशनगर, सूरजनगर, सागर कॉलनी, भारतीनगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, संपूर्ण पाषाण, सोमेश्वर वाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लमाणतांडा, मोहन नगर, सुस रस्ता.

गांधी भवन टाकी परिसर

कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, हिंगणे होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुकानगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बीएसयूपी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाउनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचनगंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क 1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीबन, गांधीभवन, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी प्रायमारोज, ऑर्किड लेन 7, 9, मुंबई-पुणे बायपास रोडच्या दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीश सोसायटी, तिरुपतीनगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रस्ता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर

बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉइंट रस्ता, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तनगर

GSR टाकी परिसर

कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली नंत 1 ते 11, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. 1 ते 10

एस.एन.डी.टी (H.L.R. व M.L.R)

गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरुड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जय भवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनकवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, SNDT परिसर, कर्वे रोड, युनिव्हरसिटी, खडकी परिसर, हनुमाननगर, जनकवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी, इत्यादी.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नवी व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग

मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट संपूर्ण परिसर, MES, HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

चतुश्रृंगी टाकी परिसर

औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत,
संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंधी सोसायटी, औंध गाव परिसर.

पर्वती HLR टाकी परिसर

सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुंकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग 1 व 2,
लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण,
प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण,
भाग्योदय नगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, से.नं. 42 कोंढवा खुर्द, साईबाबानगर इ.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Water Supply | Water supply to ‘this’ area of Pune will be closed on Thursday

हे देखील वाचा :

Pune Crime | स्वारगेट परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा; 17 जणांवर गुन्हा

Pune Crime | किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक ; पैसे घेऊन अन्नधान्याचा पुरवठा नाही; चौघांच्या विराेधात गुन्हा

Rohit Sharma | आफ्रिकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर देखील रोहित शर्माला सतावत आहे ‘हि’ चिंता

Related Posts