IMPIMP

Punit Balan Group | प्रो पंजा लीग मध्ये पुनीत बालन ग्रुपच्या मुंबई मसल संघाची एन्ट्री; पुनीत बालन यांनी घेतली संघाची मालकी

by nagesh
Punit Balan Group | Entry of Punit Balan Group's Mumbai Muscle team in Pro Panja League; Entrepreneur Punit Balan took ownership of the team

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Punit Balan Group | आशियातील सर्वात मोठ्या आर्म-रेसलिंग प्रमोशन प्रो पंजा लीगच्या (Pro Panja League) बहुप्रतिक्षित पहिल्या सीझनमध्ये आता मुंबई मसल हा संघ (Mumbai Muscle Team) सहभागी होणार आहे. या संघाची मालकी युवा उद्योजक पुनीत बालन (Entrepreneur Punit Balan)यांनी घेतली आहे. यनिमित्ताने पुनीत बालन ग्रुपने आणखी एका भारतीय खेळाला प्रोत्साहन दिले आहे. (Punit Balan Group)

पुनीत बालन ग्रुपचे (Punit Balan Group) अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) बॉलीवूड अभिनेते आणि प्रो पंजा लीगचे सह मालक परवीन दबास (Parvin Dabas)आणि प्रीती झांगियानी (Preeti Jhangiani) यांच्यात नुकताच या संबंधीचा करार झाला. आर्म-कुस्तीच्या चाहत्यांचे डोळे लागलेली ही स्पर्धा 28 जुलै ते 13 ऑगस्ट 2023 या 17 दिवसांच्या कालावधीत होणार आहेत. या स्पर्धेत सहा संघांमध्ये विभागलेले 180 आर्म कुस्तीपटू सहभागी होतील. प्रो पंजा लीगमध्ये पुरुष, महिला आणि विशेष अपंग कुस्तीपटूंसाठी श्रेणी असणार आहेत. देशभरातील आर्म-रेसलिंग चाहत्यांसाठी ही स्पर्धा ही एक पर्वणी ठरणार आहे. सोनी स्पोर्ट्स टेन 1 आणि सोनी स्पोर्ट्स टेन 1 एचडी चॅनेलवर क्रीडा रसिकांना ही स्पर्धा पाहता येणार आहे.

दरम्यान क्रीडा क्षेत्रात सातत्याने मोठे योगदान देत असलेल्या पुनीत बालन ग्रुपकडून टेबल टेनिस, खो खो, बॅडमिंटन, हॅडबॉल, क्रिकेट अशा विविध खेळांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले जातात. अल्टीमेट खो खो, टेनिस लिग, प्रीमिअर बेडमिंटन लीग, हॅन्डबॉल लीग आणि महाराष्ट्र आयरमन संघ (Maharashtra Ironman Team) यांचे स्वामित्व पुनीत बालन यांच्याकडे आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

केवळ क्रिकेटच नाही तर देशातील सर्वच खेळांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे अशी नेहमीच भूमिका राहिली आहे.
पंजा हा प्रत्येकाच्या बालपणाचा एक प्रमुख भाग आहे
आणि स्पर्धात्मक स्वरुपात त्याची भरभराट होत असल्याचे पाहणे खरोखरच उल्लेखनीय आहे.
प्रो पंजा लीग सुलभतेने देशामध्ये त्याची वाढ होण्याबरोबरच मुंबई मसल लीगमध्ये सामील झाल्याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.

– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.
(Punit Balan, Chairman, Punit Balan Group)

Web Title :  Punit Balan Group | Entry of Punit Balan Group’s Mumbai Muscle team in
Pro Panja League; Entrepreneur Punit Balan took ownership of the team

हे देखील वाचा

Slum Rehabilitation Tender | मुंबईतील धारावी प्रमाणे पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसनसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार

Aswani Cricket Cup (ACC) 2023 Tournament | ‘रॉयल चॅलेंजर्स’ने पटकविले आसवानी क्रिकेट कपचे विजेतेपद

Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंनी मविआ पासून दूर रहावे’, प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर उदय सामंत म्हणाले…

Related Posts