IMPIMP

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी उपांत्य फेरीत दाखल

by nagesh
Punit Balan Group | First 'Balan Trophy' Under-12 Cricket Championship! Paes Athletic Cricket Academy, Aryans Cricket Academy reach semifinals

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Punit Balan Group | स्पोर्ट्सफिल्डस् मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘बालन करंडक’ अजिंक्यपद १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. (Punit Balan Group)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

लिजंडस् क्रिकेट मैदान, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत स्वरीत पाटील याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ८ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीला २० षटकात केवळ ८९ धावाच करता आल्या. आर्यन्स् संघाच्या स्वरीत पाटील (३-१५) आणि संकर्षण खांडेकर (२-७) यांनी चमकदार गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला खिंडार पाडले. हे आव्हान आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीने अव्देत सी. (३२ धावा) आणि दिया वाय. (२९ धावा) यांच्या फलंदाजीमुळे १२.३ षटकात पूर्ण केले. (Punit Balan Group)

हर्ष पाश्ते याच्या नाबाद ३८ धावांच्या जोरावर पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमीने विसड्म क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा १० गडी राखून सहज पराभव केला. विसड्म संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात ५९ धावाच जमविता आल्या. पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या हर्ष पाश्ते याच्या नाबाद ३८ धावांच्या खेळीमुळे हे आव्हान ७.३ षटकात पूर्ण केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरी

गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद ८९ धावा (राशी व्यास २५, अर्जुन देशमुख १६, स्वरीत पाटील ३-१५, संकर्षण खांडेकर २-७) पराभूत वि. आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १२.३ षटकात २ गडी बाद ९३ धावा (अव्देत सी. ३२, दिया वाय. २९, अर्जुन देशमुख २-२१); सामनावीरः स्वरीत पाटील;

लिजंड्स स्पोर्ट्स क्लबः १९.३ षटकात १० गडी बाद ११४ धावा (वेदांत सुंटाळे २६, अर्थव कुंजीर २९, पार्थ पाठारे १९, अहमद सिद्दकी ४-१८, क्षितीज जाधव २-१८) वि.वि. एफ३ स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद ८६ धावा (समर्थ पोकळे नाबाद ३५, क्षितीज जाधव १०, निहार नील २-१५, वेदांत सुंटाळे १-९); वेदांत सुंटाळे;

विसड्म क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद ५९ धावा (अमित सोनिग्रा नाबाद १३, युवराज बिश्त १-५, देवाशिष घोडके १-७) पराभूत वि. पेस अ‍ॅथलेटिक क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ७.३ षटकात बिनबाद ६१ धावा (हर्ष पाश्ते नाबाद ३८, अर्जुन डोंगरे नाबाद १); सामनावीरः हर्ष पाश्ते;

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Punit Balan Group | First ‘Balan Trophy’ Under-12 Cricket Championship! Paes Athletic Cricket Academy, Aryans Cricket Academy reach semifinals

हे देखील वाचा :

PVC Aadhaar Card मागवणं झालं एकदम सोपं, एका ऑर्डरमध्ये येईल संपूर्ण कुटुंबाचं कार्ड; जाणून घ्या

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दररोज 70 रुपये गुंतवून मिळवू शकता दीड लाख रुपये, जाणून घ्या

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण ! ‘पलक’चं लग्नासाठी ब्लॅकमेलिंग ते 2 सेवकांचा ‘दगा’, दोषींना 6 वर्ष कारावासाची शिक्षा

Related Posts