IMPIMP

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा;स्मार्ट लायन्स् संघ अंतिम फेरीत !

by nagesh
Punit Balan Group Women's Premier League | 7th Puneet Balan Group Women's Premier League T-20 Cricket Tournament; Smart Lions team in the final!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Punit Balan Group Women’s Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत आयेश शेख हिच्या कामगिरीमुळे स्मार्ट लायन्स् संघाने वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबचा १० गडी राखून धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली. (Punit Balan Group Women’s Premier League )

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबला पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ५० धावाच जमविता आल्या. माधुरी आगव हिलाच फक्त दुहेरी धावसंख्या गाठता आली. स्मार्ट संघाच्या रोहीनी माने (२-६), किरण नवगिरे (२-१४) आणि वैष्णवी के. (२-१७) यांनी अचूक गोलंदाजी करून वॉरीयर्स संघाच्या डावाला खिंडार पाडले. हे आव्हान स्मार्ट लायन्स्ने ६.२ षटकात पूर्ण केले. आयेशा शेख हिने नाबाद ३४ धावा तर, करीष्मा शिंदे हिने नाबाद १४ धावा करून संघाचा सहज विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

उपांत्य फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकाल –

वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबः १५.३ षटकात १० गडी बाद ५० धावा (माधुरी आगव १९, रोहीनी माने २-६, किरण नवगिरे २-१४, वैष्णवी के. २-१७) पराभूत वि. स्मार्ट लायन्स्ः ६.२ षटकात बिनबाद ५३ धावा (आयेशा शेख नाबाद ३४ (२२, ७ चौकार), करीष्मा शिंदे नाबाद १४); सामनावीरः आयेशा शेख.

Web Title :- Punit Balan Group Women’s Premier League | 7th Puneet Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament; Smart Lions team in the final!

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | भाडेतत्वावर मोटार घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 30 लाखांच्या 8 मोटारी जप्त

Ayurvedic Remedies For Heat Stroke | उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

Pune PMPML Bus | …म्हणून ‘या’ 13 मार्गावरील PMPML बस सेवा बंद ! पीएमपीचा मोठा निर्णय

7th Pay Commission | कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात येतील 1.50 लाख रूपये, मिळणार 18 महिन्यांचा DA Arrears, डीएसंबंधी आली मोठी माहिती

Bollywood Actress Above 40 But Not Married | चांगल्या मुलाच्या शोधात 40 च्या पुढे गेल्या ‘या’ सौंदर्यवती, दिसतात सुपर हॉट

Type 2 Diabetes | ब्लड शुगर ठेवायची असेल कंट्रोल तर ‘या’ एका गोष्टीपासून रहा दूर; जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला

Related Posts