IMPIMP

Punit Balan-Murlidhar Mohol | नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा जंगी सत्कार ! ‘पुनीतदादा बालन मित्र मंडळा’चा पुढाकार (Videos)

Punit Balan-Murlidhar Mohol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Punit Balan-Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha) नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ (MP Murlidhar Mohol) यांचा ‘गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक यांच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला. ‘पुनीत दादा बालन मित्र मंडळा’च्या (Punit Dada Balan Mitra Mandal) पुढाकारातून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विजयानंतर हा पहिलाच जाहीर सत्कार होता.

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी तब्बल सव्वा लाखांच्या मताधिक्याने पुणे लोकसभेची जागा जिंकून दिमाखात संसदेत पाऊल ठेवले. त्यांच्या या विजयात सर्वच घटकांचे महत्वाचे योगदान असले तरी गणेश मंडळांसह नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक यांनी दिलेला जाहिर पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न मोलाचे आहेत. त्यामुळे मोहोळ यांच्या विजयानंतरचा त्यांच्या पहिल्याच जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन कसबा गणपती येथे ‘पुनीत दादा बालन मित्र परिवार’ यांच्यावतीने करण्यात आले होते.

यावेळी ढोल ताशांच्या गजरात जेसीबीतून गुलालाची उधळण करीत मोहोळ यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रामदैवत कसबा गणपतीची (Kasba Ganpati) आरती करण्यात आली आणि त्यानंतर मोठा पुष्पहार घालून मोहोळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यासह मोठ्या संख्येने मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना खासदार मोहोळ म्हणाले की, ‘‘पुनीत दादा बालन यांनी गणेश मंडळ, नवरात्र मंडळ आणि ढोल ताशा पथक यांना एकत्र करून मला जाहीर पाठिंबा दिला. यामुळेच कसबा मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले. मी देखील गणेश मंडळाचा एक कार्यकर्ता आहे. याचा मला कायम अभिमान आहे.’’

‘‘गणेश मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक यांनी मुरलीधर मोहोळ यांना भरभरून मतदान केले. मंडळाचा कार्यकर्ता खासदार व्हावा ही प्रत्येकाची इच्छा होती. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांनी आणि बाप्पाच्या आशिर्वादाने ही इच्छा पूर्ण झाली. आता आपला प्रतिनिधी दिल्लीत जाणार याचा अभिमान वाटतो. यामुळे सरकार दरबारी मंडळांचे विविध प्रश्न सुटण्यासही मोठी मदत होणार आहे.’’

* पुनीत बालन (उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)
* Punit Balan (Trustee & Festival Head Of Shrimant Bhausaheb Rangari Ganapati Trust)