IMPIMP

Punit Balan | युवा उद्योजक पुनीत बालन, जान्हवी धारीवाल बालन यांनी बजावला मतदानाचा हक्क, पुणेकरांना मतदान करण्याचे केले आवाहन (Video)

by sachinsitapure
Punit Balan-Janhavi Dhariwal Balan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Punit Balan | राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha) चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी 7 पासून सुरू झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. सकाळपासून पुण्यातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’ (Punit Balan Group-PBG) व ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चे (Indrani Balan Foundation) अध्यक्ष युवा उद्योजक पुनीत बालन (Young entrepreneur Punit Balan) , आर एम डी फाऊंडेशनच्या (RMD Foundation) अध्यक्षा तथा माणिकचंद ऑक्सिरिचच्या (Manikchand Oxyrich) संचालिका जान्हवी धारीवाल बालन (Janhavi Dhariwal Balan) यांनी सकाळी 11 वाजता बुथ 11 कस्तुरबा गांधी विद्यालय म.न.पा. शाळा क्र. 39 कोरेगांव पार्क दक्षिण बाजूची इमारत खोली क्र. 4 (इंग्रजी माध्यमशाळा) येथे मतदान केले. यावेळी त्यांनी पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन केले.

मतदान केल्यानंतर युवा उद्योजक पुनीत बालन, जान्हवी धारीवाल बालन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी पुणेकरांना आवाहन करतो की ज्यांनी अद्याप मतदान केले नाही, त्यांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. सर्वांनी बाहेर येऊन मतदान करावे. मतदान करणे हा स्वत:चा हक्क आहे. सर्वांनी येऊन मतदान करावे. आम्ही सहकुटुंब मतदान केले आहे, जे मतदान करत आहेत त्यांनी शहराच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी मतदान केले आहे. मी सर्व मतदारांना आवाहन करतो की, भारताच्या विकासासाठी येऊन मतदान करावे, असे आवाहन पुनीत बालन यांनी केले.

आज सकाळ पासून मतदार मतदानासाठी येत आहेत. सकाळी नऊची आकडेवारी पाहिली त्यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांनी सकाळपासून मतदान केंद्रावर जाऊन रांगा लावून मतदान केले याचा आनंद आहे. संध्याकाळी सहा पर्य़ंत मतदानाची वेळ आहे, ज्या मतदारांनी मतदान केले नाही त्यांनी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन पुनीत बालन यांनी पुणेकारांना केले आहे.

Muralidhar Mohol’s Statement To Punekar | पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे पुणेकरांना निवेदन; म्हणाले – ‘पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविणार’

Related Posts