IMPIMP

Raigad Fort | 7 डिसेंबरपर्यंत रायगडावर पर्यटकांना प्रवेश बंदी; रायगड-अलिबाग पोलीसांची माहिती

by nagesh
Ramnath Kovind | president ramnath kovind will go raigad fort ropeway not helicopter chhatrapati sambhaji bhosale

रायगड : सरकारसत्ता ऑनलाइन Raigad Fort | किल्ले रायगडवर (Raigad) छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) हे 7 डिसेंबर रोजी येणार आहेत. यामुळे सुरेक्षेच्या कारणास्तव रायगडावर पर्यटकांना प्रवेश बंदी (Raigad Fort) घालण्यात आली आहे. रायगड किल्ला 7 डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचं रायगड-अलिबाग पोलीस (Raigad-Alibag Police) अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

रायगड-अलिबाग पोलीस कार्यालयाच्या मााहितीनूसार, 3 ते 7 डिसेंबर 2021 दरम्यान किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वेही (Raigad ropeway) पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग देखील सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यटकांची गैरसोय होवू नये या दृष्टीने राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या दोन दिवसांपुर्वीच याबाबत माहिती देण्यात आली आहे. (Raigad Fort)

दरम्यान, भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले (MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale)
यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांना रायगड भेटीचं आमंत्रण दिलं होतं.
हे आमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारलं आहे. ‘राष्ट्रपतींना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.
यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत,
असं खा. संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Raigad Fort | raigad fort to remain close for tourist as president ramnath kovind to visit durgraj raigad to pay his respect to chhatrapati shivaji maharaj

हे देखील वाचा :

Pune News | …तर मेट्रो प्रकल्प 2 वर्षे रेंगाळणार व खर्चही 70 कोटी रुपयांनी वाढणार ! गणेश मंडळांनी डिझाईन बदलाचा आग्रह मागे घेण्याची महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विनंती

Pune Crime | राज्यस्तरीय खेळाडूच्या बनावट प्रमाणपत्रांवर बनला सहायक पोलीस उपनिरीक्षक, पर्दाफाश झाल्यानंतर पुण्यात FIR

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 97 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts