IMPIMP

Raigad Sahkari Bank | आता मुंबईतील ‘या’ बँकेत गडबड, 15000 पेक्षा जास्त काढण्यावर RBI ने आणली बंदी

by nagesh
 Raigad Sahkari Bank | reserve bank of india rbi ban on raigarh sahkari bank of maharashtra due to irregularities

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुंबईतील रायगड सहकारी बँके (Raigad Sahkari Bank) वर रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) अनेक निर्बंध लादले आहेत. सहकारी बँकेच्या ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. या निर्बंधांच्या अंमलबजावणीनंतर रायगड सहकारी बँकेच्या खातेदारांना 15 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. याशिवाय रिझर्व्ह बँकेने आणखी काही निर्बंध लादण्याची माहिती दिली आहे. (Raigad Sahkari Bank)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सहकारी बँकेवर लावले हे निर्बंध
रिझर्व्ह बँकेने एका अधिसूचनेत ही माहिती दिली. मध्यवर्ती बँकेने रायगड सहकारी बँकेला पूर्वपरवानगीशिवाय कर्ज देण्यासही मनाई केली आहे. त्याचप्रमाणे रायगड सहकारी बँक कोठेही गुंतवणूक करू शकत नाही किंवा ग्राहकांकडून नवीन ठेवी स्वीकारू शकत नाही. रायगड सहकारी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत आणि चालू खात्यातून 15,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

रद्द केला नाही बँकिंग परवाना
सहकारी बँकांवरील हे निर्बंध पुढील सहा महिने लागू राहतील, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या पुढील आदेशावरून स्थिती स्पष्ट होईल. रायगड सहकारी बँकेवर निर्बंध लादण्याची घोषणा करणे म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असा अर्थ नाही, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. (Raigad Sahkari Bank)

मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयामुळे सहकारी बँकेच्या ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. मात्र, सहा महिन्यांनंतर त्यांच्या अडचणी दूर होऊ शकतात, ही दिलासादायक बाब आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आरबीआयने या बँकेवर लावला दंड
देशातील सर्व बँका आणि वित्तीय संस्थांवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवते. काही विसंगती आढळल्यास, रिझर्व्ह बँक अशी पावले उचलते.
सेंट्रल बँकेने सांगितले की, रायगड सहकारी बँकेची आर्थिक स्थिती जसजशी सुधारेल तसतसे निर्बंध शिथिल होतील.

सेंट्रल बँकेने एका वेगळ्या निवेदनात म्हटले आहे की, श्री छत्रपती राजर्षी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
(Shree Chhatrapati Rajarshi Urban Co-Operative Bank Ltd) ला 6 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बँकिंग फ्रॉड क्लासिफिकेशन आणि अहवाल (Banking Fraud Classification and Reporting) देण्यास होत असलेल्या विलंबामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Web Title :- Raigad Sahkari Bank | reserve bank of india rbi ban on raigarh sahkari bank of maharashtra due to irregularities

हे देखील वाचा :

EPFO ला विश्वास, शेयर मार्केटमध्ये येणार्‍या इन्व्हेस्टर्ससाठी ’अच्छे दिन’

Ramdas Kadam | ‘शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला’ ! शिवसेना पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही’ – रामदास कदम

Anti Corruption Bureau (ACB) Sangli | 25 हजाराची लाच प्रकरणी 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात; सांगली पोलिस दलात खळबळ

Related Posts