IMPIMP

Railways Special Plan | जनरल डब्ब्यात सहज मिळेल जागा, स्लीपर कोचमध्ये सुद्धा कन्फर्म तिकीट पक्के! रेल्वेने बनवला हा विशेष प्लान

July 10, 2024

नवी दिल्ली : Railways Special Plan | भारतीय रेल्वे गाड्यांच्या जनरल कोचमध्ये प्रवाशांची भयंकर गर्दी असते. यामुळे सेकंड क्लास कोचमध्ये दररोज लाखो प्रवाशांना धक्काबुक्की आणि गर्दीचा सामना करत प्रवास करावा लागतो. तर, स्लीपर कोचमध्ये सुद्धा मागणी जास्त असल्याने सहजपणे कन्फर्म तिकिट मिळत नाही. यामुळे प्रवाशांनी सोशल मीडियावर याबाबत आवाज उठवल्यानंतर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.

आता ही स्थिती लवकरच बदलणार आहे. कारण सामान्य माणसाचा प्रवास सुखकारक करण्यासाठी भारतीय रेल्वे पुढील दोन आर्थिक वर्षात १०,००० विना-वातानुकुलित डब्ब्यांची निर्मिती करणार आहे.

उत्तर रेल्वेने मंगळवारी एका वक्तव्यात म्हटले की, या उपक्रमाचा हेतु सामान्य प्रवाशांसाठी सुविधा वाढवणे आहे. पुढील दोन वर्षात १०,००० विना-वातानुकूलित डब्बे बनवल्यानंतर एकुण प्रवाशी डब्ब्यांमध्ये त्यांचा सहभाग २२ टक्के वाढेल.

आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान रेल्वे सामान्य (जनरल) कॅटेगरीचे २,६०५ डब्बे, स्लीपर क्लासचे १,४७० डब्बे आणि एसएलआर (गार्ड आणि दिव्यांगांसाठी आरक्षित) श्रेणीचे ३२३ डब्ब्यांसह ३२ पार्सल व्हॅन आणि ५५ पँट्री कारची निर्मिती करणार आहे. या उपक्रमात अमृत भारत ट्रेनसाठी सुद्धा जनरल, स्लीपर आणि एसएलआर कोच असतील.

अशाप्रकारे आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुद्धा जनरलचे २,७१० डब्बे, स्लीपरचे १,९१० डब्बे, ५१४ एसएलआरचे डब्बे, २०० पार्सल व्हॅन आणि ११० पँट्री कारचे उत्पादन केले जाईल.