IMPIMP

Rain in Maharashtra | राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागात धुवाँधार पाऊस

by nagesh
Rain in Maharashtra | yellow alert for rain in the entire maharashtra weather update

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात पावसाचा पुन्हा जोर (Rain in Maharashtra) वाढणार आहे. सध्या राज्यात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस (Heavy Rain) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशाच्या अनेक भागांत पाऊस सक्रिय (Rain in Maharashtra) होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर या पाच जिल्ह्याला आज हवामान विभागाने (Meteorological Department) ऑरेंज अलर्ट (Orange Alert) दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मध्य प्रदेश मधील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील (Vidarbha) काही नद्यांना महापूर येऊ शकतो अशी देखील भीती हवामान विभागाकडून व्यक्त केली गेली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 ते 48 तासांत मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IMD ने उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट (Yellow Alert) दिला आहे.
तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा (Rain in Maharashtra) अंदाज वर्तवला आहे.

कोकणमधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आजपासून 22 ऑगस्टला काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर ठाणे, पालघर आणि मुंबईतही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत आजपासून 22 ऑगस्टला प्रामुख्याने घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, नागपूर आदी जिल्ह्यांत आज आणि उद्या मुसळधार तर अकोला,
अमरावती, वर्धा आदी भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, परभणी इत्यादी जिल्ह्यांत मध्य स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Web Title : –  Rain in Maharashtra | moderate rainfall in the mumbai in next 2 days maharashtra rain update

हे देखील वाचा :

Pune Crime | शालेय मुलीच्या लैंगिक शोषणाची प्रशासनाकडून गंभीर दखल, ‘तो’ नराधम शिक्षक निलंबित

Eknath Khadse | एकनाथ खडसेंना मोठा धक्का ! जिल्हा दुध संघाने अतिरिक्त खर्च केल्याचा ठपका, संचालकमंडळावर कारवाई करण्याचे आदेश; मंदाकिनी खडसेंच्या अडचणीत वाढ

Pune News | श्री उवस्सहग्गरं स्तोत्राच्या सामूहिक पठणाचे आयोजन

Related Posts