IMPIMP

Rain in Maharashtra | थंडीच्या दिवसात पडणार पाऊस, राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट

by nagesh
Rain in Maharashtra | rain updates monsoon return rain may continue for next 4 days in maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – सोमवार (दि.27) पासून वायव्य भारतात (Northwest India) आणि मंगळवार (दि.28) पासून मध्य भारतात पश्चिमी वाऱ्यांचा (Westerly winds) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्याने विदर्भ (Vidarbha), मराठवाड्यासह (Marathwada) मध्य महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं (Rain in Maharashtra) सावट निर्माण झालं आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह (Thunderstorm) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता आहे. खरीप हंगाम अवकाळी पावसामुळे वाया गेला तर रब्बी हंगामावरही अवकाळी पावसाचे ढग जमा होऊ लागले आहे. त्यामुळे वर्षाचा शेवट देखील निसर्गाच्या संकटाला तोंड देण्यात जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’
हवामान विभागाने येत्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता वर्तवली आहे. जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Heavy rain) पडेल तर नाशिक, धुळे, बीड आणि नांदेड या चार जिल्ह्यांत अंशत: ढगाळ वातावरण राहील. तसेच या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात बुधवारी (दि.29) कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. बुधवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Web Title :- Rain in Maharashtra | weather forecast 28 and 29 december unseasonal rain in viradbha and marathwada imd predicted

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook Page for every update

हे देखील वाचा :-

Salman Khan | ‘भाईजान’ सलमान खानला ‘सर्पदंश’ ! 7 तास हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमीट; पनवेलच्या फार्म हाऊसमधील घटना

Vastu Tips | ‘हे’ 7 संकेत सांगतात की बदलणार आहे तुमचे नशीब, तुमच्या घरी होणार आहे पैशांचा पाऊस

Gopichand Padalkar | भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांसह जयंत पाटील आणि पवार कुटुंबियांकडून माझ्या हत्येचा कट’ (व्हिडीओ)

GST | सोसायटीमध्ये राहत असाल तर मेंबर-फीमध्ये 2017 पासूनचा ‘जीएसटी’ द्यावा लागेल, 1 जानेवारीपासून नियम आणतंय सरकार, जाणून घ्या

Pune Crime | 50 लाखाचे खंडणी प्रकरण ! RTI कार्यकर्ता सुधीर आल्हाटची रवानगी पोलिस कोठडीत

Related Posts