IMPIMP

Rain in Maharashtra | राज्यात आज ‘येलो अलर्ट’ ! पुणे, मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता

by nagesh
Rain in Maharashtra | yellow alert in the maharashtra there is a possibility of heavy rain in pune and mumbai maharashtra rain news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Rain in Maharashtra | राज्यात थैमान घालणाऱ्या पवासाचा वेग आता मंदावला आहे. असे असले तरी काही
भागात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण,
मराठवाड्यात पावसाचा वेग मंदावला (Rain in Maharashtra) असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत काहींशी घट झाली आहे. दरम्यान, राज्यात
मुसळधार पावसाचा वेग मंदावला असला तरी तुरळक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. पुणे (Pune), मुंबई (Mumbai) आणि उपनगरात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सध्या गुजरात (Gujarat) ते उत्तर केरळच्या किनारपट्टीलगत (North Kerala Coast) द्रोणीय स्थिती आहे. तर सौराष्ट्रापासून उत्तर-पूर्व अरबी समुद्रापर्यंत येत्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Zone) तयार होणार आहे. या स्थितीमुळे कोकणच्या किनारपट्टीवर (Konkan Coast) सोसायट्यांचा वारा वाहून मुसळधार पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain in Maharashtra) पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल. परंतु उर्वरित ठिकाणी हलका पाऊस पडेल तर काही ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात आज (दि.11) पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर (घाटमाथा), सातारा (घाटमाथा), अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rain in Maharashtra | yellow alert in the maharashtra there is a possibility of heavy rain in pune and mumbai maharashtra rain news

हे देखील वाचा :

Bacchu Kadu | बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार का ? दीपक केसरकर म्हणाले…

Maharashtra Jalana IT Raid | जालनामध्ये स्टील फॅक्टरीमध्ये प्राप्तीकर विभागाचा छापा ! 390 कोटींची संपत्ती जप्त, रोकड मोजण्यासाठी लागले 13 तास

Laal Singh Chaddha Review | आमिर खानने सर्वकाही जिंकले, ‘लाल सिंह चड्ढा’ प्रत्येक हिंदुस्तानीने पाहिला पाहिजे

Related Posts