IMPIMP

Raj Thackeray-Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून वातावरण तापलं ! राज ठाकरेंनी दिला इशारा, म्हणाले – ‘गरज पडली तर…’

by nagesh
Raj Thackeray-Maharashtra Karnataka Border Issue | maharashtra karnataka border dispute mns chief raj thackereay warning to bommai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Raj Thackeray-Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापला आहे. त्यावरून राज्यातील विरोधी पक्ष शिंदे सरकारला पाण्यात पाहात आहेत. या प्रकरणी राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नाही, असे विरोधकांचे मत आहे. त्यामुळे त्यांना विरोधकांच्या रोषाचा मोठा सामना करावा लागत आहे. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उडी घेतली आहे. राज ठाकरे यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. आगामी काळात होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवा आहे आणि त्याचसाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केले जाते आहे, असे राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray-Maharashtra Karnataka Border Issue)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्राने आजपर्यंत जे काही मिळवले ते संघर्ष करून मिळवले आहे. त्यामुळे यापुढेदेखील तुमच्यासोबत संघर्षाला आम्ही तयार आहोत. पण, हा संघर्ष टाळता येऊ शकतो. केंद्राने यासाठी या प्रकरणात लक्ष घालावे. महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद उफाळून यावा, यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरू झाले आहेत. याला राज्यातून कोणी खतपाणी घालत आहे का? कर्नाटकाने सुरू असलेले प्रकार तात्काळ थांबवले पाहिजेत, असे यावेळी ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray-Maharashtra Karnataka Border Issue)

तसेच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला गेला आहे. हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचाराने सुटायला हवा. पण, जर समोरून संघर्षाची कृती झाली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही.
अचानकपणे चहुबाजूंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधे सोपे नाही.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटे कशी पिरगळली जातील हे पाहावे.
थोडा वेळ महाराष्ट्राच्या सीमाप्रशनावर सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवले पाहिजे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांत एकजिनसीपणा आहे. महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत कर्नाटकात आहे, तर अनेक कन्नडीगांची कुलदैवते महाराष्ट्रात आहेत. दोन राज्यांतील बंध मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. संघर्ष न होण्यात आणि मैत्री टिकविण्यात सर्वांचे हित आहे, असे ठाकरेंनी नमूद केले.

Web Title :- Raj Thackeray-Maharashtra Karnataka Border Issue | maharashtra karnataka border dispute mns chief raj thackereay warning to bommai

हे देखील वाचा :

PCMC | पीसीएमसीमधील तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ

LPG Gas Cylinder Charges | डिलिव्हरी बॉय ‘गॅस टाकी घरपोच’चे अतिरिक्त पैसे घेतोय, तर ही पोस्ट नक्की वाचा

SC On Demonetisation | सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार न्यायालयाला; सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि आरबीआयला फटकारले

Pune Pimpri Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरला अटक

Related Posts