IMPIMP

Raj Thackeray | राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘आपले-आपले पैसे कमवा अन् आपली-आपली दुकानं चालवा, असं चाललंय’ (व्हिडीओ)

by bali123
Raj Thackeray | make your own money run your-own shop raj government corona restriction

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात महापालिका निवडणुका (Municipal Corporation elections) न घेता त्याठिकाणी प्रशासक (Administrator) नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात घेण्याचा कट सरकर आखत असल्याचा गंभीर आरोप मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर असून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी करण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात आले आहेत. ते आज पक्षाच्या कर्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राज ठाकरे यांनी पुण्यातील (Pune) पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी सण, उत्सव आणि कोविडच्या निर्बंधावरुन सरकारवर निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकारकडून आगामी काळातील सणांवर घालण्यात आलेल्या निर्बंधावरुन त्यांनी केंद्र (Central) आणि राज्य सरकारच्या (State Government) विरोधात संताप व्यक्त केला.

आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा

केंद्र सरकारनेही दहीहंडी आणि गणेशोत्सव सणासाठी निर्बंध लागू केल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, मला वटतंय की, या सगळ्या लॉकडाउनमध्ये त्यांच्या हे लक्षात आलंय की, जे चाललंय ते बर चाललंय. कारण कुठं आंदोलनं नाहीत, मोर्चे नाहीत, सरकारच्या विरोधात कुणी रस्त्यावर उतरत नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकानं चालवा आणि बरं चाललंय सरकारचं, असं म्हण्त त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच कोरोनाची दुसरी लाट येणार, तिसरी लाट येणार अशी भीती दाखवली जाते. हे कुठपर्यंत चालणार ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारला निवडणुका नको आहेत

राज्य सरकारला सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका नकोत. निवडणूक घेण्याची सरकारची इच्छा नाही. याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) मुद्दा पुढे करुन निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटले.

जनगणना करुन निवडणुका घ्या

सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका राज्य सरकारलाच नको आहेत. हे सरकारच्या फायद्याचे असेल. असं नको व्हायला.
जर निवडणुका झाल्या नाहीत तर महानगरपालिका सरकारच चालवणार.
मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत.
ओबीसी आरक्षणाचा विषय पुढे करुन सरकार काही तरी साध्य करतेय.
जनगणना व बाकी सगळ्या गोष्टी झाल्यावर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही, असंही राज ठकारे यांनी म्हटलं.

Web Title : Raj Thackeray | make your own money run your-own shop raj government corona restriction

हे देखील वाचा :

Related Posts