IMPIMP

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेची मोठी खेळी, मनसेला दिला झटका

by nagesh
Pune MNS Office Bearers Resign | muslim mansainik resign from party after raj thackeray gudhi padwa speech on remove loud spears from mosques masjid mns party worker

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन आगामी महानगरपालिका निवडणुका (Municipal Elections Maharashtra) लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांचे दौरे सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुढील आठवड्यात महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra Tour) करणार आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे औरंगाबादला (Aurangabad) भेट देणार आहे. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबाद दौऱ्यापूर्वी शिवसेनेने (Shivsena) मनसेला मोठा धक्का दिला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुढील आठवड्यात औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. मात्र, त्यापूर्वीच शिवसेनेने मनसेला धक्का दिला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) हे औरंगाबाद दौऱ्यावर असताना मनसेतील स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याने मनसेला हा एक मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर आहेत. या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने खेळी खेळत मनसे पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना गळाला लावले आहे. त्यामुळे याचा परिणाम मनसेच्या मतांवर (Votes) होईल अशी चर्चा आहे. आता आगामी काळात हे कळेल की शिवसेनेने खेळलेली ही खेळी किती यशस्वी ठरते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. पुढील आठवड्यापासून औरंगाबाद दौऱ्यावर ते असणार आहेत.
त्यांचा दौरा कसा असणार याबाबत मनसे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे.
परंतु शहरातील मनसेची झालेली पडझड पाहता राज ठाकरेंचा दौरा मनसेसाठी किती महत्त्वाचा ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title :- Raj Thackeray | shivsena played big game before raj thackeray aurangabad maharashtra tour blow to mns

हे देखील वाचा :

Pune Crime | बनावट कागदपत्र्याद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून पतसंस्थेची 12.75 लाखांची फसवणूक; दत्तवाडी पोलिस ठाण्यात FIR

PM Kisan | 12 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! e-KYC पूर्ण केल्याशिवाय येणार नाही 10वा हप्ता, जाणून घ्या प्रक्रिया

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटले; कात्रज परिसरातील घटना

Related Posts