IMPIMP

Rajabhau Phansalkar | स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजाभाऊ फणसळकर यांचे निधन

पुणे : Rajabhau Phansalkar | पुण्यातील सुप्रसिद्ध केप्र मसालेवाले यांचे माजी भागीदार, स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष रामकृष्ण केशव उर्फ राजाभाऊ फणसळकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, सून, विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

राजाभाऊ फणसळकर यांनी त्यांची पुण्यातील कारकीर्द रास्ता पेठेतील राजा धनराज गिरजी हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून केली. त्यानंतर ते एव्ही भट यांच्या केशव लक्ष्मी प्रसाधन (केप्र) मसालेवाले यांच्या संस्थेत तीस वर्षे भागीदार होते. भागीदारीतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी स्वतःचा डिपार्टमेंटल स्टोअर चा व्यवसाय सुरू केला होता. पुणे स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे काम त्यांनी अनेक वर्ष केले. या संस्थेचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले होते. त्याचप्रमाणे सह्याद्री हॉस्पिटलच्या समवेदना या संस्थेचे ते सल्लागार समिती सदस्य होते. रोटरी क्लब ऑफ गांधी भवनचे ते संस्थापक सदस्य होते. त्याचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले होते. त्यांच्या निधनाने पुण्यातील व्यापारी वर्गातील तसेच सामाजिक क्षेत्रातील एक मोठा दुवा निखळलेला आहे. व्यवसाय किंवा दुकानाचे उत्तम व्यवस्थापन, सचोटीचे व्यवहार व उत्कृष्ट संवाद कौशल्य हे राजाभाऊंचे खास वैशिष्ट्य होते. त्यांच्यावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.