IMPIMP

Rajan Salvi | ‘…तर रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध नाही’ – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी

by nagesh
Rajan Salvi | '...so we are not opposed to the refinery project' - Rajan Salvi of Shiv Sena's Thackeray group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   कोकणात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पावर आज (दि. 22) उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली.
यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन साळवी (Rajan Salvi) देखील उपस्थित होते. या बैठकीत हा प्रकल्प कसा होणार, याबाबत चर्चा करण्यात
आली. तसेच या प्रकल्पाला अर्जुना धरणातील पाणी न वापरता कोयना धरणातील पाणी वापरण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यावर राजन
साळवी (Rajan Salvi) यांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये बारसू, सोगाव, गोवळ या परिसरात रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी स्थानिक जनतेने मागणी केल्यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. त्या बैठकीचे निमंत्रण मला दिले होते. त्यांच्यासमोर आम्ही 5 मुद्दे मांडले. सदर मुद्दे उद्योगमंत्री आणि उद्योग विभागाने मान्य केले आहेत. स्थानिक जनतेचे जे प्रश्न आणि मागण्या आहेत, त्या पूर्ण होणार आहेत. उद्योग विभागाने आणि कंपनीने मंजुरी दिल्यानंतर आम्ही प्रकल्पाला 100 टक्के मान्यता देऊ, असे त्या बैठकीत सांगितले गेले. जर हे मुद्दे उदयोग विभागाने मान्य केले नाहीत, तर भविष्यात प्रकल्पाला विरोध केला जाईल. ही आमची भूमिका आहे, असे यावेळी राजन साळवी (Rajan Salvi) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोकण रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारने पावले उचलने सुरु केले आहे.
कोकण रिफायनरी प्रकल्पाला कोयना धरणाचे पाणी वापरण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
तसेच या प्रकल्पासाठी कोयना धरणातून पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.
त्यामुळे ही पाईपलाईन ज्या भागांतून आणि गावांतून जाणार आहे, त्यांना देखील त्यातून पाणी दिले जाईल.
हा प्रकल्प शेतकरी आणि स्थानिकांना विश्वासात घेऊन करण्यात येणार असल्याचे देखील उदय सामंत यावेळी म्हणाले.

Web Title :- Rajan Salvi | ‘…so we are not opposed to the refinery project’ – Rajan Salvi of Shiv Sena’s Thackeray group

हे देखील वाचा :

Nana Patole On Devendra Fadanvis | ‘देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार राहिला नाही…”; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हल्लाबोल

Ajay Devgan | बॉलिवूड चित्रपट अयशस्वी होण्याबद्दल अजय देवगणचे मोठे विधान; म्हणाला…

Bhagat Singh Koshyari | वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपालांचा दिल्ली दौरा

Pune Pimpri Crime | समाजसेवा करतो म्हणून कोयत्याने सपासप वार करुन पत्नीचा केला विनयभंग; वाकड परिसरातील घटना

Related Posts