IMPIMP

Rajan Vichare | ‘मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरु आहे’ – खा. राजन विचारे

by nagesh
Rajan Vichare | no law and order in cm eknath shinde led maharashtra govt and thane constituency says mp rajan vichare

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन   शहरात ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) यांच्यात सोमवारी रात्री 9 च्या सुमारास हाणामारीचा प्रकार घडला आहे. त्यामुळे राजन विचारे (Rajan Vichare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. राजन विचारे (Rajan Vichare) म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरु आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन विचारे (Rajan Vichare) उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपशहरप्रमुख दीपक साळवी, हेमंत नार्वेकर आदी लोक होते. भेट घेऊन ते निघाले असता, एका ठिकाणी त्यांची भेट बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक योगेश जानकर (Yogesh Jankar) यांच्याशी झाली. यावेळी जानकर यांनी दीपक साळवी यांना ‘मला काय बघतोस’ असे विचारले. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची आणि अंगावर धाऊन जाणे ईत्यादी प्रकार झाले. त्यानंतर दोनही गटात मारामारी झाली.

यावर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी प्रतिक्रिया दिली आहे, विचारे म्हणाले, आम्ही कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही.
राज्यात यंत्राणांचा वापर करुन विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
माझ्या 40 वर्षांच्या राजकारणात अशी झुंडशाही मी कधी पाहिली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघात आम्ही आमच्या पक्षवाढीसाठी फिरु नये,
हा लोकशाहीवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. आम्ही त्यांना जुमानत नाही.
मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात सध्या गुंडाराज सुरु आहे.

आनंद दिघे यांनी शिवसेनेच्या ठाणे शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि मोठे केले.
या आमच्या ठाणे शहराला काळीमा फासण्याचे काम सध्या शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) करत आहेत.
जनता सर्वकाही उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आणि येणाऱ्या काळात जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असेही विचारे म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rajan Vichare | no law and order in cm eknath shinde led maharashtra govt and thane constituency says mp rajan vichare

हे देखील वाचा :

Mumbai Pune Express Highway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी नवीन उपाययोजना, अनेक संस्था एकत्र येऊन करणार काम

Pune Crime | जेजुरीच्या आयएसएमटी कंपनीत अंगावर लोहरस पडून आठ कामगार जखमी

Girish Mahajan | ‘जितेंद्र आव्हाड प्रकरण सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे’ – गिरीश महाजन

Related Posts