IMPIMP

Rajendra Bathiya On Budget 2023 | व्यापार्‍यांच्या दृष्टीने समाधानकारक अर्थसंकल्प – दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया

by nagesh
Rajendra Bathiya On Budget 2023 | Satisfactory budget for traders - The Poona Merchants Chamber President Rajendra Bathiya

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन  – Rajendra Bathiya On Budget 2023 | केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत सन २०२३- २०२४
साठी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना दि पूना मर्चंटस् चेंबरचे (THE POONA MERCHANTS CHAMBER) अध्यक्ष राजेंद्र बाठिया
यांनी सांगितले की, आजच्या अर्थसंकल्पात अनेक सकारात्मक गोष्टींचा समावेश केला आहे. चेंबरने अर्थसंकल्पापूर्व ज्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी
सर्वसामान्यांच्या आयकराच्या करमाफ मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. (Rajendra Bathiya On Budget 2023)

तसेच उच्च उत्पन्न वर्गावरील सरचार्जमध्ये कपात करण्यात आलेली आहे. भरडधान्य उत्पादन तसेच डाळी कडधान्ये यांच्या उत्पन्नासाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. अग्रो स्टार्टअपसाठी फंडाची तरतुद करण्यात आलेली आहे. पर्यंटनाचा विकास तसेच इंफ्रास्ट­ःचर डेव्हलपमेंट यामध्ये मोठी तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच व्यवसायासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोविडमध्ये नुकसान झालेल्या छोट्या व्यापार्यांना भरपाई देणे, एमएसएमई सेक्टरसाठी स्पेशल पकेजची घोषणा, विवीध कर रिर्टन भरणे आता सोपे होणार इ. सकारात्मक गोष्टींमुळे  हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे, अशी प्रतिक्रिया दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

Web Title :- Rajendra Bathiya On Budget 2023 | Satisfactory budget for traders – The Poona Merchants Chamber President Rajendra Bathiya

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime News | दुसऱ्या तरुणासोबत का बोलतेस म्हणत महिलेचा विनयभंग, भोसरी परिसरातील घटना

PM Narendra Modi | ‘हे बजेट करोडो देशवासियांचे आयुष्य बदलेल’- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mumbai Championship League T-20 | ‘मुंबई चॅम्पीयनशीप लीग’ ट्वेन्टी-२०’ अजिंक्यपद जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !!

Related Posts