IMPIMP

Rajesh Tope | ‘Corona वाढत असला तरी काळजी करण्याचे कारण नाही, नागरिकांनी…’ – राजेश टोपे

by nagesh
Rajesh Tope | corona is growing tno reason to worry citizens should be careful in the rainy season maharashtra health minister rajesh tope

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rajesh Tope | मुंबई (Mumbai) तसेच आसपासच्या उपनगरामधील कोरोनाच्या (Corona) संख्या वाढत असल्याचे दिसत असले तरी चिंता करण्याचे कारण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. ‘पावसाळ्यामध्ये डायरियासारखे आजार होण्याची भीती अधिक असते म्हणून ग्रामीण त्याचबरोबर झोपडपट्टी भागातील नागरीकांनी पाणी उकळून पिण्याच्या सूचना देखील राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यावेळी बोलताना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, “आज जी कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. ते मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane) यासारख्या एक दोन जिल्ह्यातच दिसून येत आहे. या परिसरात रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यांची चिंता करण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर मंकीपाॅक्सबद्दल (MonkeyPacks) देखील हा रोग आला असला तरी मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरातील नागरीकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही, असं देखील ते म्हणाले.
हा रोग आपल्याकडे आला नसून तो येऊ नये यासाठी शासनस्तरावर आम्ही काळजी घेत असल्याचेही ते म्हणाले.

मंकीपाॅक्सबद्दल सांगताना राजेश टोपे म्हणाले, “खबरदारी म्हणून विमानतळावरच आम्ही येणा-या
प्रवाशांची तपासणी करुनच त्यांना प्रवेश देत आहोत.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी दुषित पाण्यामुळे साथीचे रोग आणि अन्य आजाराचे प्रमाण
वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरीकांनी खबरदारी म्हणून पाणी
उकळून पिणे आवश्यक असल्याचं,’ राजेश टोपे म्हणाले.

Web Title :- Rajesh Tope | corona is growing tno reason to worry citizens should be careful in the rainy season maharashtra health minister rajesh tope

हे देखील वाचा :

Sachin Waze | सचिन वाझेचा माफीचा साक्षीदाराचा अर्ज विशेष कोर्टाकडून मंजूर; अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ?

CM Uddhav Thackeray | एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले – ‘पैशांचं…’

Sanjay Raut And Vasant More | पुण्यात संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्यात भेट; ‘तात्यां’ च्या कामाचं केलं तोंडभरुन कौतुक !

Related Posts