IMPIMP

Rajesh Tope | ‘क्वारंटाईन कालावधी सगळीकडे 7 च दिवसांचा राहिल’

by nagesh
Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope gives important information about coronavirus third wave in maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Rajesh Tope | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे (Coronavirus) रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. आज (सोमवारी) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांच्याबरोबर साडेतीन ते साडेपाच वाजेपर्यंत जवळ-जवळ 2 तास पाच राज्यांचा आढावा घेणारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर राज्याची परिस्थिती काय आहे, याची त्यांनी माहिती दिली. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्यात क्वारंटाईन (Quarantine) कालावधी बाबत संभ्रम होता. नेमका किती दिवस हा कालावधी असणार याबाबत माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. संपूर्ण राज्यातील क्वारंटाईनचा कालावधी हा सारखाच असणार आहे. तो सगळीकडेच सात दिवसांचा राहिल. यामध्ये कुठेही कोणालाही सूट नसणार आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर शाळा बंद करण्याच्या निर्णय असो वा हे लादलेले निर्णय असोत, हे विचारपूर्वकच घेतले आहेत, लादलेले निर्बंध चांगल्या स्पिरीटने घ्या,अशी विनंतीही टोपे यांनी केली आहे.

‘सध्या महाराष्ट्रातील ऍक्टिव्ह केसेस (Active Cases) आजच्या 1 लाख 73 हजार आहेत.
यामधील आयसीयूमध्ये (ICU) 1711 रुग्ण आहेत.
हे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्येच्या एक टक्काच आहेत.
थोडक्यात, आयसीयू बेडवरचे एक आणि ऑक्सिजन बेडवरचे दोन टक्के असे 3 टक्के रुग्णच गंभीर अवस्थेत आहेत.
राज्यातील 13 टक्के रुग्ण माईल्ड स्थितीमधले आहेत.
राज्यात कुठेही मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची परिस्थिती नाही.
हे सांगण्यामागचं कारण असं की, राज्यात 38850 आयसीयू बेड्स आहेत. यापैकी 1710 सध्या अँडमिट आहेत.
त्यामुळे बेड्सची एकूण उपलब्धता आणि त्यातुलनेत सध्याचे रुग्ण कमी आहेत.’ असं टोपे म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, ‘व्हेंटीलेटरच्या 16 हजारच्या बेड्सपैकी तीन ते चार टक्के रुग्ण सध्या आहेत. राज्यातील 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीयेत. राज्यातील 89 टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे तर 60 टक्के लोकांचा दूसरा डोसही पूर्ण झाला आहे. लसीकरण (Vaccination) जास्त झालेल्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलायझेशन अत्यंत कमी आहे, त्यामुळे लसीकरणावरच अधिक भर देण्यात येणार असल्याच राजेश टोपे म्हणाले.

Web Title :-  Rajesh Tope | the quarantine period will last only seven days everywhere in maharashtra rajesh tope

हे देखील वाचा :

Omicron Symptoms | ओमिक्रॉनचे ‘हे’ लक्षण सर्वप्रथम दिसून येते, व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांमध्ये सुद्धा दिसतोय ‘हा’ संकेत

Pimpri Corona Updates | चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1200 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune First | अग्रेसर पुण्यासाठी ‘पुणे फर्स्ट’ उपक्रम – सभागृह नेते गणेश बिडकर यांची माहिती

Related Posts