IMPIMP

Rajesh Tope | दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता? राजेश टोपे म्हणाले…

by nagesh
Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope said retiring doctors do not have extensions

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rajesh Tope | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona virus) प्रभाव नियंत्रीत आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार अगदी सुरळीत सुरू आहे. त्यातच आज पासून मंदिरे देखील सुरू करण्यास राज्य सरकारकडून (State Government) परवानगी दिली आहे. तसेच पुढील येणारा सन म्हणजे दसरा आणि दिवाळी हे बघता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आजपासून मंदिरे सुरू करण्यात आली आहे. मात्र, अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची (Corona virus) शक्यता असल्याचा इशारा टोपे यांनी दिला आहे. दसरा आणि दिवाळी नंतर तिसऱ्या लाटेची शक्यता वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आपण विशेष लसीकरण करत आहोत. जेणेकरून आरोग्यावर जास्त गंभीर परिणाम होणार नाही. अशी माहिती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले, मुस्लिम बांधवांनी बऱ्यापैकी लसीकरण केलं आहे. मात्र मालेगांव सारख्या काही ठराविक ठिकाणी लसीकरण कमी झाल्याचेही दिसून आले आहे.
मात्र, त्या ठिकाणी देखील धर्मगुरु, मौलवी, सामाजिक संस्था याचं सहकार्य घेऊन लसीकरण केलं जाणार आहे.
तसेच, वर्ष दीड वर्षांपासून सुरू असलेली मंदिरे खुली झाली आहेत.
मंदिराबाबतची नियमावली सर्वांनी पाळावी. मंदिरांनाही सूचना केल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, त्याच बरोबर उद्यापासून म्हणजेच 8 ऑक्टोबरपासून ते 14 ऑक्टोबरपर्यंत हे ‘मिशन कवच कुंडल’ सुरू राहणार आहे.
15 ऑक्टोबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट केंद्राने दिले आहे.
त्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असून राज्यात कुठेही लस कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहे. असे राजेश टोपे म्हणाले.

Web Title :- Rajesh Tope | third wave likely around diwali says health minister rajesh tope

हे देखील वाचा :

Tata Group | रतन टाटा यांच्या टायटनची बाजारात ‘धूम’, TCS नंतर ‘हा’ टप्पा गाठणारी बनली दुसरी कंपनी

Ajit Pawar | अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाची ‘छापेमारी’; उपमुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?

Pune Crime | महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळवून नेणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडले

Related Posts