IMPIMP

Rajesh Tope | ‘राज्यात मास्क मुक्ती होणार का?’ राजेश टोपे म्हणाले…

by nagesh
Maharashtra Corona | maharashtra health minister rajesh tope on fourth wave of covid

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rajesh Tope | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन व्हेरिएंटनचे (Omicron Variant) रूग्ण वाढताना दिसत आहे. राज्यातील मोठ्या शहरात रूग्णांची संख्या वाढती आहे. तर लहान शहरात बाधितांचे प्रमाण कमी आहे. दरम्यान राज्यातील कोरोना परिस्थीती आणि त्यावरील उपायाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे. ‘कोरोनासोबत जगण्यासाठी आता नवी नियमावली बनवायला हवी,’ असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याचं टास्क फोर्स एकत्र काम करणार असल्याच देखील त्यांनी म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काल (गुरूवारी) राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet) बैठक पार पडली. या दरम्यान काय चर्चा झालीय. याबाबत बोलताना राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ”एक नक्की आहे की मुंबई, ठाणे, पालघर या भागात रुग्णवाढीचा ट्रेंड होता. तो आता कमी झालाय. ही दिलासादायक बाब म्हणता येईल. परंतु, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगबाद इथली रुग्णसंख्या मात्र वाढत आहे. पण पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर एक लक्षात येईल की जिथे रुग्णसंख्या वाढत आहे तिथे 5 टक्क्यांच्या वर बेड ऑक्युपन्सी नाही म्हणजेच रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज नाही. आयसीयू आणि व्हेंटिलेटरवरचे (ICU And Ventilator) रुग्ण 1 टक्क्यांहूनही कमी आहेत.”

”इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड, युरोपीय राष्ट्रांमध्ये, अमेरिकेतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र त्या ठिकाणी विशेषतः युकेमध्ये मास्कमुक्ती करण्यात आलेली आहे, निर्बंध कमी केले आहेत. जर ही चर्चा घडवून आणली आणि सांगितलं की आम्हालाही मार्गदर्शन करा तर मुख्यमंत्री आणि कॅबिनेटने असे स्पष्ट निर्देश दिले आहेत राज्य टास्क फोर्स, केंद्रीय टास्क फोर्स, आईसीएमआर सर्वांना कळवलं पाहिजे की तो निर्णय जर विज्ञानाधिष्ठित असेल तर तो का घेतला कसा घेतला? आणि मग त्याबद्दल महाराष्ट्रालाही मार्गदर्शन व्हावं अशी अपेक्षा कॅबिनेटने व्यक्त केलीय.
आम्ही त्या पद्धतीच्या सूचना कालच्या बैठकीनंतर आईसीएमआर, राज्य टास्क फोर्स आणि केंद्रीय टास्क फोर्सला पाठवल्या आहेत,” असं राजेश टोपे म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, ”रोज रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे रुग्ण बाधित आढळण्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.
त्यामुळे आता आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल, अशा संकल्पनेतून आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल.
हे आपल्याला पाश्चिमात्य देशांत रुग्णसंख्या वाढत असतानाही निर्बंध कमी केल्यातून दिसत आहे.” असं राजेश टोपे म्हणाले.

Web Title :- Rajesh Tope | will maharashtra be mask free state health minister rajesh tope says

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 55 जणांवर कारवाई

Diabetes | ‘मधुमेह’च्या रूग्णांसाठी अतिशय लाभदायक आहे अश्वगंधा, जाणून घ्या कशी करते शुगर कंट्रोल

SBI Debit Card Pin And Green Pin | ‘एसबीआय’च्या खातेधारकांसाठी दिलासा ! आता ‘या’ सोप्या पद्धतीने घरबसल्या जनरेट करू शकता डेबिट कार्ड PIN व ग्रीन पिन

TET Exam Scam | राज्यातील तब्बल 7800 शिक्षक बोगस? अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास ! शिक्षण विभागात मोठी खळबळ, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले…

Related Posts