IMPIMP

Rajinikanth-Baba Movie | 20 वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट

by nagesh
Rajinikanth-Baba Movie | rajnikanth superhit movie baba is re releasing in theater know reasons and details

सरकारसत्ता ऑनलाईन  टीम : Rajinikanth-Baba Movie | कोरोना व्हायरसचा परिणाम चित्रपटसृष्टीवर मोठ्या प्रमाणात झाला. या कालावधीमध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. तसेच जे चित्रपट प्रदर्शित झाले ते प्रेक्षकांना फारसे आकर्षित करू शकले नाहीत. याचा फटका बॉलिवूडला मोठ्या प्रमाणात बसला. चित्रपट अपयशी होत असल्याने थिएटर मालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे थिएटर मालक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन पद्धतीचा अवलंब करत आहेत. एवढंच नाही तर प्रेक्षकांना थिएटरमध्ये परत आणण्यासाठी काही जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येत आहेत. (Rajinikanth-Baba Movie)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यामुळे आता प्रेक्षकांना थिएटरमध्ये जुन्या चित्रपटाचा अनुभव घेता येणार आहे. दिग्गज अभिनेते आणि सुपरस्टार रजनीकांत यांचा एक चित्रपट तब्बल 20 वर्षांनी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. रजनीकांत यांचा ‘बाबा’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बाबा हा चित्रपट 10 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. या चित्रपटाचे शो सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या चित्रपटाची किंमत फक्त 99 रुपये असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ही तिकीट परवडेल आणि ते अधिकाधिक चित्रपटाकडे आकर्षित होतील. या चित्रपटाचे बहुतांश शो चेन्नईच्या कमला सिनेमात चालवले जाणार आहेत. (Rajinikanth-Baba Movie)

‘बाबा’ हा चित्रपट 2002 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटात रजनीकांत यांच्यासह अभिनेत्री मनीषा कोईराला, सुजाता आणि अमरीश पुरी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
20 वर्षांपूर्वी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
आता पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहता येणार आहे. 12 डिसेंबर रोजी रजनीकांत यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निर्मात्यांनी 10 डिसेंबरला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे राजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी ही मोठी मेजवानीच म्हणावी लागेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rajinikanth-Baba Movie | rajnikanth superhit movie baba is re releasing in theater know reasons and details

हे देखील वाचा :

Sangali Miraj Kupwad Municipal Corporation | ‘माझी वसुंधरा’अंतर्गत सांगली महानगरपालिकेला सात कोटींचे बक्षीस

Sangli ACB Trap | 1700 रूपयाची लाच घेताना नागरी सुविधा केंद्रातील महिला ऑपरेटरसह तिचा मुलगा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

MLA Rohit Pawar | ‘शरद पवार जे बोलतात ते करून दाखवतात’; रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा

Related Posts