IMPIMP

Raju Shetty | ‘भाजपा ‘या’ 3 जणांच्या माध्यमातून राज्य सरकार उलथवण्याचा प्रयत्न’ – राजू शेट्टी

by nagesh
Raju Shetti | swabhimani shetkari saghtana leader raju shetti claims maharashtra goverment minister take bribe from goverment servant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनRaju Shetty | महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष केवळ राजकीय घडामोडींवर लागले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडाळीला आता वेग येत आहे. जवळपास चाळीसहून अधिक आमदार शिंदे गटात असल्याचा दावा करण्यात येत आहे. भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करण्याच्या चर्चा देखील पसरल्या असल्याचं दिसत आहे. या घडामोडीनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनीही प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले, “भाजपाकडं असलेल्या ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय या 3 अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपा ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय, हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक असल्याचं,” ते म्हणाले.

या दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात एक वेगळं वळण लागलं आहे.
एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर संपूर्ण राजकीय क्षेत्राचं सूत्र हाललं आहे.
अशातच भाजप सोबतच युती करण्याचे एक आव्हान त्यांनी शिवसेनेला दिले आहे. त्यामुळे यावर तोडगा कसा निघेल यावर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, आज शिवसेनेकडून 12 आमदारांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “निलंबन करण्याचा अधिकारच नाही. कारण आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे आणि ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद असल्याचंही,” एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

Web Title :- Raju Shetty | swabhimani shetkari sanghatana chief raju shetty has criticized the bjp ed cbi income tax

हे देखील वाचा :

Eknath Shinde | भाजप नव्हे ! एकनाथ शिंदेंनी ‘त्या’ महाशक्तीचा केला खुलासा; म्हणाले…

Pune Crime | पालखी दर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसुत्र लांबविले

Sanjay Raut On BJP | नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा भाजपला सवाल; म्हणाले…

Eknath Shinde | ‘माझ्यासोबत 50 आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ’ – एकनाथ शिंदे

Related Posts