IMPIMP

Rakesh Jhunjhunwala | नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर पत्रकाराने विचारला प्रश्न, यावर राकेश झुनझुनवाला यांनी दिले हे उत्तर (व्हिडीओ)

by nagesh
rakesh jhunjhunwala narendra modi meeting broker reaction on the meeting is condemned by sanjay singh vinod kapri surya pratap singh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Rakesh Jhunjhunwala | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नुकतीच भारतीय शेयर बाजाराचे ‘बिगबुल’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीची काही छायाचित्रे सोशल मीडियावर वादग्रस्त ठरली होती. कारण खुर्चीत आरामशीर बसलेले झुनझुनवाला यांच्यासमोर पीम मोदी हाताची घडी घालून उभे असल्याचे दिसत होते. आता राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधानांसोबतच्या आपल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ज्या प्रकारे त्यांनी पीएमसोबतच्या भेटीचे वर्णन केले आहे, त्यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टिका होत आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

क्लिप सोशल मीडियावर वायरल

झुनझुनवाला यांना आज तक च्या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला की, त्यांनी तुम्हाला का आमंत्रित केले…ते आम्ही विचारणार नाही.
ते तुम्हाला काय म्हणाले आणि तुम्ही त्यांना काय म्हणालात? या प्रश्नावर राकेश झुनझुनवाला म्हणाले, मधुचंद्रा (suhagraat) च्या रात्री मी माझ्या बायकोशी काय चर्चा केली होती…ही सांगण्यासारखी गोष्ट आहे का. त्यांचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हसू लागले.
मात्र, कार्यक्रमाची क्लिप सोशल मीडियावर शेयर करून लोक झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्यावर टिका करत आहेत.

ये रिश्ता क्या कहलाता है?

काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे चेयरपर्सन रोहन गुप्ता (Rohan Gupta, chairperson of the social media department of the Congress) यांनी या व्हिडिओची क्लिप आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत निशाणा साधला आहे की, ये रिश्ता क्या कहलाता है? प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंजुल (Famous cartoonist Manjul twit) यांनी ट्विट केले की, एक शेयर ब्रोकर दिड अरब लोकसंख्येच्या लोकशाही देशाच्या पंतप्रधानासोबत झालेल्या आपल्या भेटीची तुलना मधुचंद्राच्या रात्रीशी करतो. ही स्थिती झाली आहे पंतप्रधान पदाची, डंकापतीच्या राज्यात.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

खरोखरच लाजिरवाणे वक्तव्य

चित्रपट निर्माते विनोद कापडी (Filmmaker Vinod Kapadi) आपल्या ट्विटमध्ये लिहितात, खरोखरच लाजिरवाणे.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Aam Aadmi Party MP Sanjay Singh) यांनी सुद्धा राकेश झुनझुनवाला यांच्या उत्तरावर आपल्या ट्विटमध्ये म्हटले की,
भारताच्या पंतप्रधानांची प्रतिष्ठा इतकी खाली घसरेल, कधी विचार केला नव्हता की शेयर मार्केटचा दलाल पंतप्रधानांची तुलना मधुचंद्राच्या रात्रीच्या पत्नीसोबत करेल.
पेटीएमची जाहिरात केली तर असेच होईल मोदीजी.

भक्तच शेयर करत आहेत व्हिडिओ

शोध पत्रकार दीपक शर्मा (Investigative journalist Deepak Sharma) यांनी ट्विट केले की,
आता एक शेयर मार्केटचा दलाल पंतपधानांची बरोबरी आपल्या पत्नीसोबत करत आहे.
मजेशीर गोष्ट ही सुद्धा आहे की, हा व्हिडिओ त्यांचे भक्त स्वता शेयर करत आहेत.

मधुचंद्राच्या रात्रीशी तुलना अतिशय दुर्दैवी

निवृत्त आयपीएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह (Retired IPS officer Surya Pratap Singh) यांनी ट्विट केले, राकेश झुनझुनवाला यांचे शब्द अतिशय लाजिरवाणे आहेत.
पंतप्रधानांना बायको आणि तिच्यासोबतच्या मधुचंद्राच्या चर्चेशी तुलना करणे अतिशय दुर्दैवी आहे.
तुम्ही बिगबुल असाल किंवा बिग बॉस, पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेची दक्षता घेतली पाहिजे होती.
काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी (Congress leader Imran Pratapgadhi) यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : rakesh jhunjhunwala narendra modi meeting broker reaction on the meeting is condemned by sanjay singh vinod kapri surya pratap singh

हे देखील वाचा :

Weight Loss Tips | अशाप्रकारे सेवन केले ओटमील, तर कमी होण्याऐवजी वाढू लागेल वजन!

Pune Court | अ‍ॅड. शाम गोपाल मुंदडा ‘त्या’ गुन्ह्यातून दोषमुक्त

Pune Corporation | पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ! कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांना दिली जाणार कोरोना लस

Related Posts