IMPIMP

Rakesh Jhunjhunwala Portfolio | राकेश झुनझुनवाला यांच्या पसंतीच्या बँक शेयरमध्ये होईल मोठा पैसा, आता स्वस्त दरात मिळतोय स्टॉक !

by nagesh
Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala owned shares fall after his death aptech star health major losers

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRakesh Jhunjhunwala Portfolio | जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी
एक आनंदाची बातमी आहे. शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Rakesh Jhunjhunwala Portfolio) समाविष्ट
असलेल्या फेडरल बँकेच्या (Federal Bank) शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. (Share Market Marathi News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सध्या या शेअरची किंमत 90 रुपयांच्या खाली आहे. पण येत्या काही दिवसांत त्याची किंमत प्रति शेअर 100 रुपयांच्या पुढे जाऊ शकते, असे बाजारातील
तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशावेळी या शेअरमध्ये पैसे गुंतवणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. (Rakesh Jhunjhunwala Portfolio)

विशेष म्हणजे, एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यात एनएसईवर 52 आठवड्यांचा उच्चांक रु. 107.55 च्या वर गेल्यापासून तो सतत विक्रीच्या दबावाखाली आहे. गेल्या आठवड्यात, शेअर 7 टक्क्यांहून जास्त तोट्यात होता.

शुक्रवारी राकेश झुनझुनवाला यांचा हा स्टॉक प्रति शेअर रू. 83.55 वर बंद झाला. हा शेअर रू. 107.55 च्या 52 आठवड्याच्या उच्चांकावरून 22 टक्क्यांहून जास्त खाली आला आहे. मात्र, शेअर बाजारातील तज्ञ दक्षिण भारतीय बँकिंग शेअर (Banking stock) मधील या घसरणीकडे खरेदीची संधी म्हणून पाहत आहेत.

मार्च 2022 च्या तिमाहीसाठी खाजगी क्षेत्रातील फेडरल बँकेचे निकाल संमिश्र आहेत. बँकेच्या नफा आणि उत्पन्नात वाढ झाली आहे.
मात्र, ऑपरेशनल कामगिरी कमकुवत आहे. बँकेने 6 मे रोजी निकाल जाहीर केला होता.
या निकालांनंतर ब्रोकरेज हाऊस शेअरवर बुलीश दिसत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बहुतांश ब्रोकरेजने गुंतवणूक सल्ला दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये सुमारे 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांनीही फेडरल बँकेत गुंतवणूक केली आहे.
झुनझुनवाला यांची बँकेत 3.7 टक्के हिस्सेदारी आहे.

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www. sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Rakesh Jhunjhunwala Portfolio | rakesh jhunjhunwala portfolio stock federal bank share may go 100 rupees expert says

हे देखील वाचा :

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

Gold Price Update | सोन्याच्या किंमतीत बंपर घसरण, खरेदीदारांमध्ये आनंद; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे ताजे दर

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

Related Posts