IMPIMP

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांना ‘या’ गुंतवणुकीवर मिळेल 6 पट रिटर्न, येणार आहे कंपनीचा IPO

by nagesh
Rakesh Jhunjhunwala | share market big bull rakesh jhunjhunwala will earn six times on star health and allied insurance ipo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Rakesh Jhunjhunwala | ‘बिग बुल’ नावाने प्रसिद्ध शेयर गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना केवळ एका कंपनीत केलेल्या गुंतवणुकीवर सहापट रिटर्न मिळणार आहे. स्टार हेल्थ अँड अलॉईड इन्श्युरन्स कंपनीत (Star Health and Allied Insurance Company) गुंतवणूक करणारे झुनझुनवाला पुन्हा एकदा मालामाल होणार आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

30 नोव्हेंबरला येणार आयपीओ
स्टार हेल्थ अँड अलॉईड इन्श्युरन्स कंपनीचा आयपीओ 30 नोव्हेंबरला येणार आहे. या दिवसापासून 2 डिसेंबरपर्यंत याची विक्री होईल. कंपनीने आपल्या आयपीओसाठी प्राईस बँड 800-900 रुपये प्रति शेयर ठरवले आहे.

स्टार हेल्थच्या आयपीओमध्ये 2000 कोटी रुपयांचे फ्रेश शेयर इशू केले जातील. सोबतच कंपनीचे सध्याचे प्रमोटर्स आणि शेयरधारकांद्वारे 58.32 मिलियन शेयरच्या विक्रीच्या ऑफर्सचा (IFS) सुद्धा समावेश आहे.

इतकी झुनझुनवाला यांची भागीदारी
सध्या कंपनीत सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट्स इंडिया एलएलपीची 47.77 टक्के भागीदारी आहे. तर राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्याकडे 14.98 आणि 3.23 टक्के भागीदारी आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

गुंतवणुकीचे मूल्य 5.79 पट वाढले
इकॉनॉमिक्स टाइम्सनुसार डेटावरून समजते की, झुनझुनवाला यांनी मार्च 2019 आणि नोव्हेंबर 2021 च्या दरम्यान नऊवेळा 155.28 रुपये प्रति शेयरच्या सरासरीने या कंपनीचे शेयर खरेदी केले होते. याचा अर्थ असा की, झुनझुनवाला यांनी 32 महिन्यांपूर्वी गुंतवणुक सुरू केल्यानंतर विमा कंपनीत त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.79 पट वाढले.

माहितीनुसार, त्यांनी मागील एक वर्षात सरासरी 256.44 रुपये प्रति शेयरच्या हिशेबाने 9,324,087 स्टार हेल्थ शेयर खरेदी केले आहेत.
त्यांची पत्नी रेखा राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 17,870,977 शेयर म्हणजे 3.23 टक्के भागीदारी आहे.

तिसरा सर्वात मोठा आयपीओ
पेटीएम आणि झोमाटोनंतर स्टार हेल्थ अँड अलाईड इन्श्युरन्स कंपनीचा आयपीओ 2021 मध्ये तिसरा सर्वात मोठा आयपीओ असेल.
कंपनी शेयर विक्रीचे निव्वळ उत्पन्न भांडवल आधारावर वाढवण्यासाठी वापरणार आहे.
सध्या, प्रमोटर्सकडे कंपनीचा 62.80 टक्के भाग आहे, तर सार्वजनिक शेयरधारक उर्वरितचे मालक आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणारी चौथी खासगी कंपनी
हा आयपीओ आल्यानंतर स्टार हेल्थ, भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणारी चौथी खासगी कंपनी बनली आहे.
यापूर्वी एचडीएफसी लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड,
आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाईफ इन्श्युरन्स आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाले आहेत.

Web Title :- Rakesh Jhunjhunwala | share market big bull rakesh jhunjhunwala will earn six times on star health and allied insurance ipo

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात ‘कोरोना’च्या 90 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

BJP MP Heena Gavit | ‘घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला’

Pune Fire | महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाइन फटून आग, मोठा अनर्थ टळला

Related Posts