IMPIMP

Ramdas Athawale | रामदास आठवलेंनी घेतली राज्यपालांची भेट

by nagesh
Ramdas Athawale | Ramdas Athawale met the Governor

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे. त्यानंतर रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.

रामदास आठवले यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावर आठवले म्हणाले, आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत, त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) आणि भारतीय जनता पक्षासोबत (BJP) एकत्र लढणार आहेत. तसेच रिपाईला सत्तेत चांगला वाटा मिळावा, अशी मागणी आम्ही भाजपकडे केली. 2012 पासून रिपाई आमच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही, असे आश्वासन भाजपने आम्हाला दिले असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच भाजप आगामी मुंबई महानगरपालिका (BMC Election) निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही.
रिपाईची सर्व ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपसोबत (BJP) राहील, असे देखील आठवले म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईला मंत्रीपद मिळेल, असे आश्वासन आम्हाला दिले गेले आहे.
तसेच राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये एक आमदार रिपाईचा देखील मागण्यात आला आहे,
असे रामदास आठवले म्हणाले.

Web Title :-  Ramdas Athawale | Ramdas Athawale met the Governor

हे देखील वाचा :

Gayatri Datar | गायत्री दातारचं टेलिव्हिजनवर कमबॅक; ‘या’ मालिकेतुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Pune Crime | हॉस्पिटलविरूद्ध तक्रार केल्याने कुटूंब संपविण्याची धमकी, आठजणांविरूद्ध गुन्हा

Pune Crime | लक्ष्मी पूजनादिवशी बुधवार पेठेत वाहनांची तोडफोड करणारे टोळके जेरबंद

Related Posts