IMPIMP

Ramdas Kadam | 1995 मध्येच राज-उद्धव ठाकरेंमध्ये मतभेद? – रामदास कदम

by nagesh
CM Eknath Shinde Ayodhya Tour | ramdas kadam attacks on sanjay raut over ayodhya rally comment

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेचे बंडखोर नेते (Shivsena Rebel Leader) रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आता पक्षांतर्गत आणि ठाकरे कुटुंबातील (Thackeray Family) जुने वाद बाहेर काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. शिवसंवाद यात्रेतून (Shiv Samvad Yatra) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) शिंदे गटावर करत असलेल्या तिखट टीकेमुळे रामदास कदम व्यथीत झाले आहेत. आता त्यांनी ठाकरे कुटुंबातील राज (Raj Thackeray) -उद्धव वादाला तोंड फोडले आहे. 1995 मध्येच राज-उद्धव यांच्यात मतभेद झाले होते, असे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटले आहे. तसेच मी राज यांच्या जवळचा होतो म्हणून मला उद्धव ठाकरेंनी वारंवार डावलले असा आरोप केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मला शाखाप्रमुखापासून आमदार (MLA) केले. पण 1995 मध्ये युतीची सत्ता येऊनही मला मंत्रिपद दिले नाही, का ते उद्धव ठाकरे यांना विचारा. बाळासाहेबांचा सेवक थापाला विचारा. बाळासाहेबांनी मला स्वत: माझे नाव असलेली यादी दाखवत म्हटले होते की, माझ्या घरात तुला घेऊ नका म्हणून भांडण सुरू आहेत. माँ तुझ्या बाजूने आहे. रामदासला शब्द दिला मग मंत्री का बनवत नाही असे माँ साहेबांनी विचारले. धारावीचे तत्कालीन आमदार बाबूराव हे सुद्धा या घटनेचे साक्षीदार होते.

रामदास कदम यांनी म्हटले, मी राज ठाकरे यांच्या सोबत होतो म्हणून मला डावलले. बाळासाहेब, माँसाहेब तयार होत्या. पण घरात भांडणे होत असतील तर मी थांबतो असे मी बाळासाहेबांना सांगितले. 2014 मध्ये जे खाते नव्हते तसे खाते विरोधी पक्षनेता जबाबदारी पार पाडलेल्या माणसाला देण्यात आले.

प्रदूषण महामंडळ (Pollution Corporation) न देण्याबाबत चिडून देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) भेटलो,
पण तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी फोन करून रामदास कदमांना महामंडळ देऊ नका, असे सांगितले.
पक्षप्रमुखांबद्दल काहीच बोलायचे नाही ही शिस्त पक्षात आहे. म्हणून आम्ही काहीच बोललो नाही.

माझे आणि राज ठाकरे यांचे खूप जवळचे संबंध होते. ज्यावेळी राज ठाकरे निघाले तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले.
ते पुण्यात गेले. शेवटच्या क्षणापर्यंत मी आणि बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar)
राज ठाकरे यांच्यासोबत होतो, आम्ही जवळचे मित्र होतो असे सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच राज यांना थांबवण्यासाठी मी मातोश्रीला गेलो, उद्धव ठाकरे यांना आम्ही विचारले राज यांना थांबवण्याचा एकदा प्रयत्न करू का? ते हो म्हणाले.
परंतु हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यावेळी मी राज ठाकरे यांच्या जवळ होतो म्हणून उद्धव ठाकरे
यांच्या मनात खटकत होते का? असा प्रश्न आजही माझ्या मनात आहे.

मोठे साहेब भाजपाला (BJP) कमळाबाई म्हणायचे, भाजपावर तुटेपर्यंत कधी टीका बाळासाहेबांनी केली नाही.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितले होते, मला मुख्यमंत्री करणार असाल तर मातोश्रीवर या त्यामुळे चुकीची माहिती लोकांसमोर नका आणू.
महाविकास आघाडीचे नाटक कसे झाले ते राऊतांना विचारा असेही रामदास कदम यांनी सांगितले.

Web Title :- Ramdas Kadam | big secret explosion of shivsena reble leader ramdas kadam disagreement between raj uddhav thackeray in 1995 itself

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय अचानक झाला नाही, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

CM Eknath Shinde | मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

Shivsena | संजय राऊतांचा बंडखोरांवर घणाघात, म्हणाले – ‘जनता शिंदे गटाची गाढवावरुन धिंड काढणार, उद्धव ठाकरे त्यांना राजकारणातून उठवणार’

Related Posts