IMPIMP

Ramdas Kadam | मुलांना जिथे जायचे तिथे जाऊ दे, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच; रामदास कदम यांनी स्पष्ट केली भूमिका

by nagesh
Ramdas Kadam i am with shiv sena uddhav thackeray till my last breath says ramdas kadam maharashtra political crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) रामदास कदम (Ramdas Kadam) हे मध्यंतरी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. एवढंच काय तर रामदास कदम (Ramdas Kadam)  हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही. मी मरेपर्यंत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यासोबत असल्याचे वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. त्यामुळे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना रामदास कदम यांनी पूर्णविराम दिला आहे. परंतु त्यांचा मुलगा आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या भूमिकेबाबत माहिती नसल्याचे सांगत त्यांनी हात झटकले.

काय म्हणाले रामदास कदम ?

मी पक्षासोबत बेईमानी करणार नाही. मी आजही शिवसेनेसोबत आहे. मी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार आहे. पण मुलांचं माहिती नाही. मुलांना त्यांच्या मतदारसंघात त्रास दिला जातो, हे खरं आहे. त्यामुळे मुलांना जिथे जायचं तिथे जाऊ द्यात, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच राहणार आहे. भगव्याची साथ सोडणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी सांगितले.

शिवसेना भवनावर (Shivsena Bhavan) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि रामदास कदम यांच्यावर कारवाई होईल अशी चर्चा होती.
मात्र, या दोघांना तुर्तास अभय देण्यात आले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
पण दुसरीकडे शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना नोटीस देण्यात आली आहे.
बंडखोर आमदारांना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्यांचे म्हणणं मांडण्यास सांगितले आहे. शिवसेनेने घेतलेल्या या बैठकीला रामदास कदम अनुपस्थित होते.

Web Title :-  Ramdas Kadam | i am with shiv sena uddhav thackeray till my last breath says ramdas kadam maharashtra political crisis

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :


Related Posts