IMPIMP

Ramdas Kadam | ‘अनिल परब हे खरे ‘गद्दार’, शपथ घेऊन सांगतो…’, रामदास कदम यांचा अनिल परब यांच्यावर घणाघात

by nagesh
Ramdas Kadam | ramdas kadam attacks anil parab over party issue kokan ask party chief uddhav thackeray look it

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मागील अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते (Shiv Sena leader) रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अखेर आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन मनातील खदखद व्यक्त केली आहे. अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात बोललं की पक्षाच्या विरोधात बोललं अशी परिस्थिती आता झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख नेमकं कोण आहेत? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की अनिल परब? असा सवाल करत रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनिल पबर कोकणात शिवसेनेचं अस्तित्त्व संपवण्याचं काम करत असून ते खरे गद्दार आहेत, असा आरोप कदम यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, अनिल परब हे शिवसेनेला गहाण ठेवण्याचं काम करत आहेत. मला आणि मुलाला तिकीट मिळू नये म्हणून परब सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मला कोणतंही मंत्रीपद नको. मी तर दोन वर्षापूर्वीच राजकारणातून निवृत्तीची (Retirement from politics) घोषणा केली. मग माझ्या नाराजीचा विषय येतोच कुठून? पण अनिल परब यांच्या आरेरावीपणाचा माझ्या मतदार संघात माझ्या मुलाला त्रास होत आहे, याचं मला दु:ख असल्याचे कदम यांनी सांगितले.

परब मनसेसाठी महात्मा गांधी बनले आहेत

पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर टीका करताना आरोप केले आहेत. अनिल परब हे दापोलीत मनसे (Dapoli MNS) कार्यकर्त्यांसाठी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) बनले आहेत. मला गद्दार ठरवण्यासाठी परब यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. ज्यावेळी शिवाजी पार्कात (Shivaji Park) माझ्या विरोधात घोषणाबाजी झाली त्याचं मला खूप वाईट वाटलं. त्यामागे कोण होतं हे समजलं पाहिजे, असे कदम म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

शपथ घेऊन सांगतो की…

रामदास कदम आणि किरीट सोमय्या यांच्यात चर्चा झाली असून अनिल परब यांच्याविरोधात
कटकारस्थान रचलं जात असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip goes viral)
झाली असल्याच्या मुद्यावर कदम यांनी स्पष्टीकरण दिलं.
मी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) शपथ घेऊन सांगतो की
माझं कधीच किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याशी चर्चा झालेली नाही.
अनिल परब यांचं हॉटेल ही काही शिवसेनेची मालमत्ता नाही.
मिलिंद नार्वेकरांनी (Milind Narvekar) अनधिकृत बांधकाम स्वत: तोडलं.
मग अनिल परबांची अनधिकृत मालमत्ता काय शिवसेनेची मालमत्ता आहे का? त्या विरोधात बोललं तर काय चुकीचं केलं? असं कदम म्हणाले.

Web Title :- Ramdas Kadam | ramdas kadam attacks anil parab over party issue kokan ask party chief uddhav thackeray look it

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau Pune | पिंपरी चिंचवड महापालिकेतील दोन लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Sukesh Chandrashekhar | ‘जॅकलिन-नोरा’नंतर श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी सुद्धा ठग सुकेश चंद्रशेखरच्या केसमध्ये ‘सामील’?

Anti Corruption Bureau | 1 रुपया हुंडा घेऊन सर्वांकडून पाठ थोपटून घेणारा नार्कोटिक्स विभागातील पोलीस निरीक्षक 2 लाखांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts