IMPIMP

Ramdas Kadam | अजित पवरांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, आणि…, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन रामदास कदमांचे टीकास्त्र

by nagesh
Ramdas Kadam | shivsena eknath shinde faction leader ramdas kadam using abusive word for anil parab at khed ratnagiri press conference

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिंदे यांच्या गटातील माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली आहे. अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) द्यावा आणि ही जबाबदारी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपल्याकडे घ्यावी, अशी मागणी रामदास कदमांनी (Ramdas Kadam) केली.

शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांचा सध्या औरंगाबादमध्ये दौरा सुरु आहे. परतीच्या पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या बांधांचा ते आढावा घेऊन सरकारवर टीका करत आहेत. त्यावर रामदास कदम (Ramdas Kadam) बोलत होते. कदम म्हणाले, ज्यांना कावीळ असते, त्यांना सर्व जग पिवळे दिसत असते. तशीच अवस्था आता उद्धव ठाकरेंची झाली आहे. ते मागील अडीच वर्षात मातोश्रीतून कधीच बाहेर पडले नाहीत. केवळ दोन ते तीन वेळा ते मंत्रालयात गेले असतील. मागील अडीच वर्षात त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही आणि त्याची अंमलबजावणी केली नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच कोकणात वादळ झाले. यावेळी लाखो कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. या कुटुंबाचे अश्रू पुसायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, कधीही कोकणात गेले नाहीत. इतके वय असताना देखील शरद पवारांसारखे (Sharad Pawar) नेते नुकसानग्रस्त यांची पाहणी करायला गेले होते. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील गेले नाहीत.
पण आता उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांच्या बांधावर पाहून मला आनंद झाला.
त्यामुळे आता माझे अंतकरणापासून मागणे आहे की, अजित पवार यांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा
आणि त्या पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावी, असे कदम म्हणाले.

Web Title :- Ramdas Kadam | ramdas kadam on uddhav thackeray aurangabad visit ajit pawar should resign as opposition leader

हे देखील वाचा :

MLA Gulabrao Patil | शिंदे गटातील नाराज 22 आमदार भाजपमध्ये जाणार? गुलाबराव पाटील म्हणाले -‘राहिलेले आमदार…’

BJP MLA Atul Bhatkhalkar | मविआच्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रँडचे फटाके…, अतुल भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

MLA Sanjay Shirsat | ‘उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिलासा दिला नाही, त्यामुळे हे रामायण घडले’- आमदार संजय शिरसाट

Related Posts