IMPIMP

Ramdas Kadam | रामदास कदमांची घणाघाती टीका; म्हणाले – ‘संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’

by nagesh
Ramdas Kadam | sanjay rauts interview with uddhav thackeray is like a cat to a mouse ramdas kadam criticizes

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Samana Executive Editor Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray)यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून प्रसिद्ध झाली. मुलाखती (Interview) दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार (Rebel MLA), खासदार (MP), बंडखोरांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपवर (BJP) टीका केली होती. या मुलाखतीवरुन विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान, या मुलाखतीवरुन रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी घणाघाती टीका केली आहे. ‘संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’ अशा शब्दात रामदास कदमांनी (Ramdas Kadam) घणाघाती टीका केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, उद्धव ठाकरे यांची कालची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं देणार. हे सर्व हस्यास्पद आहे. यात नवीन काय होतं. ती गंजलेली तलवार, आईचं दूध, शिवसेना आई होती, बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) शिवसेना आशी होती, बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत, त्यांच्या विचारांसोबत गद्दारी कुणी केली, हे तुम्ही सांगा ना. आईच्या दुधाची आठवण तुम्ही ठेवताय, तर मग शिवसेनेची आई बाळासाहेबांचे विचार होते. मग बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी तुम्ही केली. हे बाकीच्यांना ठिक आहे, नवीन शिवसैनिक, तरुण पिढी या भावनिक ब्लॅकमेलमध्ये थोडे अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतला आहे, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

स्वत:चं आत्मपरिक्षण करा
आता उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील अमूक गदार, तमूक हरामखोर ही भाषा वापरत आहेत.
ही भाषा वापरण्यापेक्षा स्वत:चं आत्मपरीक्षण करुन बघा. कोण गद्दार आहे याचं आत्मपरीक्षण तुम्ही करुन बघा.
51 आमदार का जातात, 12 खासदार का जातात, हजारो नगरसेवक का जातात, आज माझ्या खेडमधील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
हकालपट्टीशिवाय दुसरं काम काय सुरु आहे. केवळ शिवसैनिकांना भावनात्मक ब्लॅकमेल करायचं, आवाहन करायचं एवढच सध्या सुरू आहे.
तीन वर्षात जर आमदारांना भेटले असते तर आज ही वेळ आली नसती, असा टोला कदम यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Web Title :- Ramdas Kadam | sanjay rauts interview with uddhav thackeray is like a cat to a mouse ramdas kadam criticizes

हे देखील वाचा :

Pune Crime | गजबजलेल्या ठिकाणी युवकाचा सपासप वार करुन खून, परिसरात खळबळ

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली ? उद्धव ठाकरेचं भाजपकडे बोट

SBI Best Investment Scheme | एसबीआयच्या टॉप 5 स्कीम ! येथे 1 लाखाचे झाले 9.5 लाख, 10 वर्षात 857% पर्यंत मिळाला रिटर्न

Related Posts