IMPIMP

Ramdas Kadam | ‘हातपाय हलत नव्हते ही उद्धव ठाकरेंची नौटंकी, हॉस्पिटलमध्ये असताना..’ – शिवसेनेचे ज्येष्ठ बंडखोर नेते रामदास कदम

by nagesh
Maharashtra Politics | ncp leader sanjay kadam will enter the thackeray group

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीने दुखावलेल्या बंडखोरांच्या प्रतिक्रिया अजूनही उमटत आहेत. आजारी असताना गद्दारांनी डाव साधला, अशा आशयाचे वक्तव्य ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये केले होते. यावर आता शिवसेनेचे ज्येष्ठ बंडखोर नेते (Rebel Leader) रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी टीका केली आहे. आजारी होतो, हातपाय हलत नव्हते ही ठाकरेंची नौटंकी असल्याचे रामदास कदमांनी (Ramdas Kadam) म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. 51 आमदार गद्दार कसे होतात. गद्दार तर तुम्ही आहात. हॉस्पिटलला होतो, हात – पाय हलत नव्हते हे सगळे नाटक आहे. उद्धव ठाकरे यांची ही नौटंकी आहे. मी मातोश्रीची (Matoshree) नस – नस ओळखतो. उद्धव ठाकरे काय आहेत, रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) काय आहेत, आदित्य (Aditya Thackeray) काय आहेत हे मला माहिती आहे.

कदम पुढे म्हणाले, आम्ही उभा केलेला पक्ष पत्त्यासारखा कोसळताना पहातोय. उद्धव ठाकरे यांना सगळे आयते मिळाले. त्यांचे योगदान काही नाही. आम्ही 52 वर्ष सगळे भोगले आहे. आमच्यासाठी सुपार्‍या दिल्यात. जे शिवसेनाप्रमुख अख्ख आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीशी लढले आणि हिंदुत्व वाढवले. त्याच काँग्रेस (Congress) – राष्ट्रवादीशी (NCP) हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपद घेतले. उद्धव ठाकरे कधीही कुणाचे ऐकत नाही. त्यांना खूप कमी लोकांनी ओळखले आहे. मी बरोबर ओळखून आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी पुरस्कृत उद्धव ठाकरे यांची शिवसेना यात जमीन आस्मानचा फरक आहे.

कदम म्हणाले, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना नेत्यांची किंमत शून्य झाली. उद्धव ठाकरे हुकुमशहा झाले.
बाळासाहेब ठाकरे साधे होते असे बोलतात पण ते हुशार होते. शिवसेना मागे जाण्यात उद्धव ठाकरेच जबाबदार आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. गद्दार तुम्ही आहात.

कदम म्हणाले, माणूस बुडतो तेव्हा हातपाय हलवतो. या आमदारांनी निर्णय घेतला नसता तर पुढच्या विधानसभेत एकही आमदार निवडून आला नसता. कारण राष्ट्रवादीने अडीच वर्षात पराभूत आमदारांना ताकद देण्याचे काम केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले, 5-10 तास आमदार (MLA), खासदारांना (MP) वर्षा बाहेर उभे करायचे. कुणाला भेट द्यायची नाही. आता तुम्ही लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटे सांगत आहात. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना रामदास कदम आणि त्याच्या मुलाला संपवण्याचे कटकारस्थान तुमचे सुरू होते. त्यावेळी बैठकीत सुभाष देसाई (Subhash Desai), आदित्य ठाकरे, विनायक राऊत (Vinayak Raut), मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar), उदय सामंत (Uday Samant) होते.

योगेशला (Yogesh Kadam) संपवून टाका. कदम कुटुंब संपवायचे आहे असे हॉस्पिटलला दाखल असताना आदेश देत होते. उदय सामंत त्या बैठकीत होते आणि ते सगळे आता बाहेर आले. सहानुभूती मिळवण्यासाठी मी बेशुद्ध होतो वैगेरे नाटके करत आहेत. पालापाचोळा तुम्ही झालात, असा घणाघात कदम यांनी केला.

उद्धव ठाकरे यांना सवाल करताना कदम म्हणाले, महाराष्ट्रात कुणालाही विचारा,
शिवसेनाप्रमुख जिवंत असते तर उद्धव ठाकरेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री बनवले असते का ? रस्त्यावर आलात का ?
संघर्ष केलात का ? तुमच्या अंगावर किती केसेस आहेत ? आम्ही जेल भोगलीय. संघर्ष केलाय.
बाळासाहेबांचा मुलगा त्याव्यतिरिक्त तुमचे शिवसेनेसाठी योगदान काय ?

Web Title : – Ramdas Kadam | shivsena rebel leader ramdas kadam criticize shiv sena chief uddhav thackeray

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | सर्वांसाठी खुशखबर ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी ?

Maharashtra Political Crisis | बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा

Business News | लक्षात ठेवा ! 1 ऑगस्टपासून बदलतील तुमच्या बँकेशी संबंधीत ‘हे’ नियम, खिशावर होईल थेट परिणाम

Related Posts