IMPIMP

Ranjitsinh Disale | शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘ग्लोबल टीचर’ डिसले यांना सवाल; म्हणाले – ‘तीन वर्षात शाळेसाठी काय केले?’

by nagesh
Ranjitsinh Disale | what you have done for school education officer asks ranjitsinh disale

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – Ranjitsinh Disale | अमेरिकेतील पीएचडी मिळवण्यासाठी परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे (Paritewadi Zilla Parishad School) ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते (Global Teacher Award) शिक्षक रणजित डिसले (Ranjitsinh Disale) यांना रजा हवी आहे. त्यासाठी त्यांनी दीड महिन्यांपूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज पाठवला आहे. त्यावर शाळेचे काय करणार ? गेल्या तीन वर्षात शाळेसाठी काय केले ? असा सवाल शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार (Dr. Kiran Lohar) यांनी उपस्थित केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अमेरिकेची डॉक्टरेट मिळवण्यासाठी रणजित डिसले (Ranjitsinh Disale) यांनी रजेसाठी डिसेंबरमध्ये अर्ज केला होता. दीड महिने होऊन गेल्याने त्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (CEO Dilip Swamy) यांची भेट घेतली. परदेशात डॉक्टरेट करण्यासाठी अध्ययन रजेची त्यांच्याकडे परवानगी मागितली. त्यावर स्वामी यांनी डिसले यानां प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांची भेट घेऊन रजेसाठी विनंती अर्ज दिला. त्यावर डॉ. लोहार यांनी डॉक्टरकीसाठीचा अर्ज विहित नमुन्यात असणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही परदेशात गेल्यावर शाळेचे काय करणार ? असा सवाल उपस्थित केला. इतके दिवस रजा देणे शक्य नसल्याचे सांगत तुम्हीच पर्याय सुचवा अशी सूचना केली. त्यामुळे पुन्हा अर्ज भरून आणण्यासाठी गावी परत यावे लागले.

दरम्यान, यासंदर्भात डॉ. लोहार (Dr. Kiran Lohar) पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ”रणजित डिसले यांनी गेल्या तीन वर्षात जिल्हा परिषदेचे नाव उंचावण्यासाठी तसेच शाळेसाठी काय केले आहे, याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कामाची फाईल सादर करण्यास संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यास सांगितले आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार डिसले यांना मिळाला हि अभिमानाची बाब आहे. पण त्यांच्या या कर्तृत्वाचा परितेवाडी शाळेला काय उपयोग झाला ? हे तपासावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आम्हाला उपयोग हवा आहे. त्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी इतकी मोठी रजा देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणे परवडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रणजित डिसले यांनी सांगितले की, ”जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ‘आयटी’ विषय शिकवत होतो. शासनाच्या ‘डाएट’ योजनेंतर्गत दोन वर्षे प्रतिनियुक्तीवर विशेष शिक्षक म्हणून माझी नियुक्ती आहे.
शिक्षणातील नवीन तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी अमेरिकेला सहा महिने जाणार आहे.
त्यासाठी रजा मिळावी म्हणून अर्ज देऊन दीड महिना झाला तरी त्याला मंजुरी का मिळाली नाही ? हे मला माहित नसल्याचे सांगितले.”

Web Title :- Ranjitsinh Disale | what you have done for school education officer asks ranjitsinh disale

हे देखील वाचा :

Woman Teacher Wins | ‘मोठ्या आवाजात’ ओरडणाऱ्या शिक्षककेला मिळाले करोडो रुपये, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Pune Crime | खळबळजनक ! दोन मित्र आमने-सामने; एकाने चालवले हत्यार, दुसऱ्याकडून 3 राऊंड फायर; एकजण जागीच ठार

SBI FD Interest Rates 2022 | फायद्याची गोष्ट ! SBI सह 3 बँकांच्या एफडीवर मिळणार जास्त व्याज

Related Posts