IMPIMP

Ranveer Singh | बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा बिग बॉस मराठी मधील ‘या’ स्पर्धकाला पाठिंबा; व्हिडिओ शेअर करत दिल्या शुभेच्छा

by nagesh
Ranveer Singh | bollywood actor ranveer singh support bigg boss marathi 4 contestant tejaswini lonari

बहुजननामा ऑनलाईन – Ranveer Singh | कलर्स वाहिनीवर बिग बॉस मराठीचा चौथा सिजन खूपच चर्चेत आहे. स्पर्धक घरात टिकून राहण्यासाठी प्रत्येक टास्क जीव तोडून खेळताना दिसत आहेत. तर स्पर्धकांच्या खेळाने प्रेक्षक सुद्धा बिग बॉस पाहण्यासाठी उत्सुक असतात. एवढेच नाही तर प्रेक्षक आवडीने बिग बॉस पाहत असतात. बिग बॉस मध्ये सदस्यांना टास्क पेक्षा देखील कशाची भीती असते ती म्हणजे नॉमिनेशन मध्ये येण्याची. नॉमिनेशन पासून वाचण्यासाठी सदस्य अनेक प्रयत्न करत असतात. तर आपल्या सदस्याला वोट देऊन सेव करण्याचा प्रयत्न देखील सदस्यांचे चाहते वेळोवेळी करत असतात. (Ranveer Singh)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आता स्पर्धकांनी या सगळ्या अडचणींवर मात करून बिग बॉसच्या घरात तब्बल 50 दिवस पूर्ण केले आहेत. सगळ्यांसाठी हा टप्पा खूपच महत्त्वाचा होता. आता बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह ने बिग बॉस मधील एका सदस्यासाठी खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. रणवीरने व्हिडिओ पोस्ट केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Ranveer Singh)

रणवीरच्या या व्हिडिओवरून रणवीर बिग बॉस मराठी फॉलो करत आहे हे मात्र नक्की. रणवीरने व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “हाय तेजू अभिनंदन बिग बॉसच्या घरात तुला पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. तू खूप छान खेळत आहेस. महेश सरांना माझा सलाम. तेजू मी तुला खूप मिस करत आहे. तुझ्या उर्वरित प्रवासासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तू जिंकून ये मग आपण सेलिब्रेट करू….. तुला खूप खूप प्रेम आणि खूप साऱ्या शुभेच्छा”. सध्या रणवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

तर बिग बॉसच्या चौथ्या सीजन मधून घराबाहेर पडलेल्या सदस्यांना घरातील कोणते सदस्य शेवटपर्यंत
टिकतील असे विचारल्यास प्रत्येकानी तेजूचे नाव घेतले आहे. एवढेच नाही तर लंबी रेस का घोडा असे म्हणून
तेजूचे कौतुकही केले आहे. घरात कोणत्याही प्रसंगी विचार करून बोलणं आणि सगळ्यांना समजून घेणे
या स्वभावामुळे तेजूंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ranveer Singh | bollywood actor ranveer singh support bigg boss marathi 4 contestant tejaswini lonari

हे देखील वाचा :

Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले – ‘मी काही ज्योतिषी नाही’

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray | ‘बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांचे विचार मोडूनतोडून टाकणाऱ्यांना…’; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंच्या प्रत्युत्तर

Uddhav Thackeray On Maharashtra Karnataka Border Issue | ‘मुख्यमंत्री म्हणतील 40 गाव कर्नाटकाला जाऊ द्या, आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यावर 100 गाव महाराष्ट्रात घेऊ’; ठाकरेंनी घेतली शिंदेंची फिरकी

Related Posts