IMPIMP

Raosaheb Danve | ‘6 खासदारांवर कोणीही पंतप्रधान होत नाही हे…’; रावसाहेब दानवेंचा थेट शरद पवारांवर निशाणा

by nagesh
Raosaheb Danve | raosaheb danve sharp question on politics in maharashtra sharad pawar maharashtra home department

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन Raosaheb Danve | राज्यात चालू असलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या धाडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद (Maharashtra Home Department) मागत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सरकारवर टीका केली. त्यासोबतच दानवेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही निशाणा साधला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजपच्या (BJP) नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी गृहखातं तयार केलं आहे का ?, राज्यात विकासाची घडी विस्कटल्याने शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा उपद्व्याप करत असल्याचं असं रावसाहेन दानवे (Raosaheb Danve) म्हणाले.
जालना (Jalna) येथे भोकरदनमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

त्यासोबतच शरद पवार हे पंतप्रधान (PM) व्हावेत यासाठी अनेक ठराव घेतले, ते एक चांगले नेते आहेत.
मात्र युती असेल तर 6 आणि युती नसेल तर 4 जागा त्यांच्या पक्षाला मिळतात आणि 6 जागांवर कुणीही पंतप्रधान होत नाही हे शरद पवारांनाही माहित आहे.
तरीही त्यांच्या पक्षाने ठराव घेतला त्यामुळे त्यावर अधिक न बोललेलं बर, असं दानवेंनी सांगितलं.

दरम्यान, लोकांना विकासाची गरज आहेत. काँग्रेसच्या ज्या आमदारांना निधी मिळाला नाही ते आमदार परत निवडून येतील की नाही असा सवाल करत ते आमच्या संपर्कात येत आहेत.
त्यामुळे असे किती नाराज आमदार आमच्या संपर्कात आहेत हे काही दिवसातच उघड होईल, असा गौप्यस्फोटही दानवेंनी केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Raosaheb Danve | raosaheb danve sharp question on politics in maharashtra sharad pawar maharashtra home department

हे देखील वाचा :

Lip Care Tips | ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

BP Control Tips | अचानक वाढले ब्लड प्रेशर तर अजमवा ‘या’ 5 टिप्स

Remedy For Joint Pain | सांधे दुखीवर ‘ही’ पाने आहेत रामबाण उपाय, वाचा सविस्तर

Pune Crime | मुल होत नसल्याने पतीसाठी दुसरी मुलगी पहायला घेऊन गेल्याने विवाहितेची आत्महत्या; हडपसर परिसरातील घटना

Related Posts