IMPIMP

Rapper Takeoff | ‘या’ प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या, कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल थक्क

by nagesh
Rapper Takeoff | american rapper takeoff shot and killed in houston

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : लोकप्रिय रॅपर टेकऑफच्या (Rapper Takeoff) चाहत्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेत गोळ्या (Shot) घालून रॅपर टेकऑफची हत्या (Murder) करण्यात आली. गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येनंतर ही बातमी समोर येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवेळी टेकऑफच्या (Rapper Takeoff) सोबत त्याचे दोन सहकारीही उपस्थित होते. रॅपर टेकऑफ हा केवळ 28 वर्षाचा होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मिळालेल्या माहितीनुसार, रॅपर टेकऑफ (Rapper Takeoff) हा त्यांच्या दोन सहकाऱ्यांसोबत ह्यूस्टनमध्ये डाईस गेम खेळत होता. या दरम्यानच त्याची थोडीशी बाचाबाची झाली आणि टेकऑफला शूट करण्यात आले. यावेळी त्यांचे दोन सहकारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. मात्र टेकऑफचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बॉलिंग ओली मध्ये जवळपास 50 लोक उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

टेकऑफच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याच्या चाहतांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर त्याचे हितचिंतक देखील सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. बॉक्सर ख्रिस उबँक्स ज्युनियर (Boxer Chris Ubanks Juniar) यांनी टेकऑफला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, “रॅपर टेकऑफ हा एकदम मस्त माणूस होता. मी आज इथे त्याला श्रद्धांजली वाहत आहे मात्र मला यावर स्वतःचाच विश्वास बसत नाही. एका शुल्लक कारणावरून पुन्हा एकदा एका ब्लॅक स्टारला विनाकारण गोळ्या घालून ठार करण्यात आले. इंडस्ट्रीमध्ये खरोखरच गोष्टी बदलण्याची गरज आहे.

टेकऑफचा जन्म 1994 मध्ये जॉर्जियामध्ये (Georgia) झाला होता.
त्याने ऑफसेट (offset) आणि कुआवोसोबत (Kuawo) रॅपिंग सुरू केले.
यानंतर या तिघांनी 2008 मध्ये क्लब सुरू केला. 2011 मध्ये तिघांनीही जुग सीझन रिलीज केला.
यानंतर त्यांनी मिगोस मिक्सटेप बनवून इंडस्ट्रीत पदार्पण केले.
टेकऑफच्या गाण्याचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. या घटनेच्या काही वेळापूर्वी टेकऑफचे नवीन गाणे रिलीज झाले होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rapper Takeoff | american rapper takeoff shot and killed in houston

हे देखील वाचा :

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले-‘राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत’

MLA Sunil Tingre | अखेर पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा, मार्थोपोलिस शाळेची जागा देण्यास मंजुरी; आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

T20 World Cup 2022 | विराट कोहलीने रचला विराट विक्रम! श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे सोडत रचला विश्वविक्रम

Related Posts