IMPIMP

Ration Card | रेशनच्या यादीतून कापले असेल तुमचे नाव, तर घरबसल्या ताबडतोब असे तपासा

by nagesh
Ration Card | how to check your name in ration card list know full process

नवी दिल्ली : वृत्त संस्थाRation Card | रेशनकार्ड हे सरकारने नागरिकांना दिलेले महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज केवळ गरिबांना अनुदानित रेशन (Ration Card) देत नाही तर ओळखीसाठी देखील वापरला जातो. नागरिकत्वाचा पुरावा, पत्त्याचा पुरावा यासाठीही याचा वापर केला जातो. शिधापत्रिकाधारकांना गहू, साखर, तांदूळ, रॉकेल इत्यादीच्या खरेदीवर सवलत मिळते. काही महिन्यांपासून यूपी, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये गरीब कुटुंबांना मोफत धान्य दिले जात आहे. (How to check your name in ration card list know full process)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अनेक ठिकाणी वापरले जाते रेशनकार्ड

जनधन खाते उघडण्यापासून ते ओळखपत्र म्हणून रेशनकार्डचा वापर केला जातो. जर कोणाकडे आधार कार्ड नसेल तर तो अनेक ठिकाणी रेशन कार्ड वापरू शकतो. परंतु काहीवेळा विविध कारणांमुळे शिधावाटप यादीतून नाव काढून टाकले जाते, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

विशेषत: रेशनकार्डच्या यादीतून तुमचे नाव काढून टाकण्यात आल्याचे तुम्हाला माहीतही नसते. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या रेशन कार्डमधील नाव कसे तपासायचे ते सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला NFSA च्या वेबसाइटवर जावे लागेल.

याप्रमाणे यादीत तपासा तुमचे नाव

  • रेशनकार्ड (Ration Card) यादीत तुमचे नाव कापले गेले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in/Default.aspx ला भेट द्या.
  • यानंतर रेशन कार्डचा पर्याय निवडा.
  • आता Ration Card Details On State Portals या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर राज्य आणि जिल्हा निवडा.
  • जिल्ह्यानंतर ब्लॉकचे नाव टाका, त्यानंतर पंचायतीचे नाव निवडा.
  • आता रेशन दुकानाच्या दुकानदाराचे नाव आणि रेशनकार्डचा प्रकार निवडा.
  • यानंतर तुमच्या समोर नावांची यादी येईल, जी शिधापत्रिकाधारकांची आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे नाव या यादीत पाहू शकता.
  • जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुमचे नाव कापले गेलेले नाही. तुम्ही ही यादी डाऊनलोड देखील करू शकता.

Web Title : Ration Card | how to check your name in ration card list know full process

हे देखील वाचा :

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना मॅच्युरिटीवर देईल 10 लाखांची रक्कम, केवळ तुम्हाला 100 रुपयांची करावी लागेल बचत

IRCTC-Post Office | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा बुक करू शकता ट्रेनचे तिकीट

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीचे दर कमी; जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

Related Posts